हरवलेला बैल शोधणाऱ्यास हताश मालकाकडून 50 हजारांचं बक्षीस

By Admin | Published: April 15, 2016 01:16 PM2016-04-15T13:16:00+5:302016-04-15T13:31:34+5:30

आवडता बैल हरवल्याने अत्यंत निराश झालेल्या मालकाने बैलाची माहिती देणाऱ्यास 50 हजाराचे बक्षीस जाहीर केले असून गावामध्ये तशी पोस्टर्सही त्याने लावली

50 thousand prizes by a desperate owner who lost the lost bull | हरवलेला बैल शोधणाऱ्यास हताश मालकाकडून 50 हजारांचं बक्षीस

हरवलेला बैल शोधणाऱ्यास हताश मालकाकडून 50 हजारांचं बक्षीस

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
वाराणसी, दि. 15 - आवडता बैल हरवल्याने अत्यंत निराश झालेल्या मालकाने बैलाची माहिती देणाऱ्यास 50 हजाराचे बक्षीस जाहीर केले असून गावामध्ये तशी पोस्टर्सही त्याने लावली आहेत. बादशाह असं या बैलाचं नाव असून तीन वर्षाच्या बादशाहचे फोटोही मनोज पांडे या मालकाने पोस्टरवर लावले आहेत. 
बैलाचं वर्णन पांडे यांनी केलं असून माझा बादशाह कुठे आहे, काही कळलं तर मला लागलीच खबर करा अशी आर्जवी विनंतीही त्यांनी केली आहे. 
एवढ्यावर न थांबता पांडेंनी सारनाथ पोलीस ठाण्यात बैल हरवल्याची तक्रार दिली आहे. बादशाह माझ्या मुलाप्रमाणे असून तो त्याच्या जन्मापासून माझ्याबरोबर असल्याचं पांडे यांनी भावूक होत एएनआय या व़ृत्तसंस्थेला सांगितलं. मला किती दु:खं झालंय ते शब्दात सांगता येणार नाही असं ते म्हणाले.
बादशाह हा केवळ प्राणी नाहीये तर तो आमच्या कुटुंबातील एक सदस्य आहे. त्याचा वावर आमच्या घरात, अगदी स्वयंपाक घरात, बेडरूममध्येही असायचा असं त्यांनी सांगितलं. जर बादशाहला कुणी पैशाच्या आशेनं पळवलं असेल तर त्याने परत आणून द्यावं या हेतुनेच 50 हजार रुपयांचं बक्षीस लावल्याचं मनोज पांडे म्हणाले.
सारनाथ पोलीस ठाण्यातले अधिकारी राजकुमार यादव यांनी सदर तक्रार दाखल केल्याचे व ही बाब गंभीरपणे घेत असल्याची प्रतिक्रिया दिल्याचे टाइम्स ऑफ इंडियाने म्हटले आहे.

Web Title: 50 thousand prizes by a desperate owner who lost the lost bull

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.