रोटरी क्लब उभारणार ५० महिला शौचालये

By admin | Published: September 2, 2015 11:31 PM2015-09-02T23:31:58+5:302015-09-02T23:31:58+5:30

पाच रुपये शुल्क आकारणार : प्रायोगिक तत्त्वावर चार ठिकाणे निश्चित

50 women toilets to set up Rotary Club | रोटरी क्लब उभारणार ५० महिला शौचालये

रोटरी क्लब उभारणार ५० महिला शौचालये

Next
च रुपये शुल्क आकारणार : प्रायोगिक तत्त्वावर चार ठिकाणे निश्चित
नागपूर : रोटरी क्लब ऑफ नागपूर ईशान्यला नागपूर शहरात पाच ठिकाणी शौचालये उभारण्याची अनुमती देण्यात आली होती. परंतु आता क्लबने शहराच्या विविध भागात महिलांसाठी ५० शौचालये उभारण्याचा प्रस्ताव मनपाच्या स्लम विभागाला सादर केला आहे.
मनपा प्रशासनाने या प्रस्तावाला अद्याप मंजुरी दिलेली नाही. परंतु प्रायोगिक तत्त्वावर महिलांसाठी पाच शौचालये उभारून त्याची देखभाल करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. पहिल्या टप्प्यात २५ ठिकाणी शौचालये उभारण्याचा प्रस्ताव असून, उर्वरित २० शौचालये पाच वेगवेगळ्या ठिकाणी उभारावयाची आहेत. शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे.
शहरात महिलांसाठी सार्वजनिक शौचालये उभारण्याची तयारी रोटरी क्लब ऑफ ईशान्यने दर्शविली होती. मनपा प्रशासनाने ३१ जुलै २०१५ ला घेतलेल्या निर्णयानुसार चार ठिकाणी शौचालये उभारण्याला अनुमती दिली आहे. त्यानुसार क्लबने तयारी सुरू केली आहे. सोबतच शहरात महिलांसाठी ५० शौचालये उभारण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने पूर्वीचा प्रस्ताव रद्द करून नवीन प्रस्ताव तयार केला आहे. शौचालयांची देखभाल पाचऐवजी तीन वर्षे करण्याची तयारी दर्शविली आहे. शौचालयाच्या ठिकाणी जाहिरात करण्याचा अधिकार मनपाकडे राहणार आहे.
मनपा प्रति शौचालयावर १.६२ लाखाचा खर्च करणार आहे. प्रति व्यक्ती शुल्क चारऐवजी पाच रुपये आकारले जाणार आहे. शौचालयातील पाणी व वीजव्यवस्था मनपा करणार आहे. परंतु बिल क्लबला भरावे लागणार आहे. (प्रतिनिधी)
चौकट..
अशी होतील प्रायोगिक शौचालये
- व्हेरायटी चौक, इंटरनिटी मॉलसमोर, फुटपाथ व पार्किंगच्या जागेवर
- वर्धा मार्गावरील पंचशील चौक, धीरन कन्या शाळेजवळ
- इतवारी, नंगा पुतळ्याजवळ
- छत्रपती चौकाजवळील एसटी बसस्थानकाच्या बाजूला

Web Title: 50 women toilets to set up Rotary Club

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.