एटीएममधून निघाली 500 रुपयांची बनावट नोट, तक्रारीकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा नागरिकांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 12:21 PM2017-11-30T12:21:32+5:302017-11-30T13:03:40+5:30
ग्रेटर नोएडातील कोतवालीतील कासना परिसरात मंगळवारी एका खासगी बँकेच्या एटीएममधून 500 रुपयांची बनावट नोट बाहेर आल्याची माहिती समोर आली आहे.
नोएडा - ग्रेटर नोएडातील कोतवालीतील कासना परिसरात मंगळवारी एका खासगी बँकेच्या एटीएममधून 500 रुपयांची बनावट नोट बाहेर आल्याची माहिती समोर आली आहे. एटीएममधून तीन जणांनी पैसे काढले तेव्हा 500 रुपयाच्या एकूण 7 बनावट नोटा बाहेर आल्या. शिवाय, काही नोटा फाटलेल्या स्थितीही होत्या व काहींचा रंगदेखील उडालेला होता. या प्रकारावर नाराजी व्यक्त तिघांनी गोंधळ घातला व पोलिसांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली. मात्र पोलिसांनी काहीही कारवाई केली नसल्याचा आरोप या तीन जणांनी केला आहे. या तिघांनी कस्टमर केअरलादेखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र, तेथेही संपर्क होऊ शकला नाही.
An ATM machine in Greater Noida's Kasna dispensed torn and fake Rs 500 notes. (28.11.17) pic.twitter.com/SfdRzvqyHT
— ANI UP (@ANINewsUP) November 30, 2017
दिल्लीच्या एटीएममधून बाहेर आली दोन हजारांची अर्धी नोट
याआधी दिल्लीतील एका एटीएममधून चक्क दोन हजार रुपयाची अर्धी नोट बाहेर आली. एटीएममध्ये एक व्यक्ती पैसे काढालया गेला असताना त्याला एटीएममधून दोन हजारांची अर्धी नोट मिळाली. दिल्लीतील जामिया परिसरात राहणाऱ्या मोहम्मद शादाब डीसीबी बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेला. त्याने ज्यावेळी पैसे काढले तेव्हा त्याला एक विचित्र प्रकाराची दोन हजार रुपयांची नोट मिळाली. ही नोट अर्धीच छापलेली होती तर तिचा अर्धा भाग कोरा कागद होता. कोणीतरी फाटलेल्या नोटेला कागद जोडल्याचे शादाबला तेथे दिसून आलं.
शादाबने एटीएममधू दहा हजार रूपये काढले होते. या दहा हजारांपैकी एक दोन हजार रूपयांची नोट खोटी बाहेर आली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मोहम्मद शादाब या व्यक्तीचं येस बँकेत खातं आहे. एटीएममधून खोटी नोट बाहेर आल्यावर मी त्या संदर्भातील तक्रार ग्राहक सेवा अधिकाऱ्यांकडे केली. पण अधिकाऱ्यांनी योग्य उत्तरं न दिल्याने मी पोलिसात तक्रार दाकल केल्याचं मोहम्मद शादाब यांनी सांगितलं.
FIR registered under section 420 IPC on complaint of a man alleging that he received a fake Rs. 2000 note from ATM at Delhi's Shaheen Bagh. pic.twitter.com/gbobIiUd7J
— ANI (@ANI) November 6, 2017
शादाबने या प्रकरणाची बँक तसेच स्थानिक पोलीस स्थानकामध्ये तक्रार केली आहे. पोलिसांनी आयपीसी कलम 420 म्हणजेच फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन घेतला आहे. या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे शादाबने एटीएममधून दहा हजार रुपये काढले. ज्यामध्ये दोन हजार, ५०० आणि १००च्या नोटांचा समावेश होता. मात्र त्याने नोटा मोजल्या त्यावेळी त्याला ही कागद जोडलेली नोट आढळून आली. दरम्यान, पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.