दिल्लीत ५00 कोटींचे फटाके पडून; व्यापाऱ्यांनी घेतलाच नाही परवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 07:02 AM2018-11-06T07:02:46+5:302018-11-06T07:03:38+5:30
दिवाळी सुरू झाली तरी दिल्लीच्या गोदामांमध्ये ५00 कोटी रुपयांचे फटाके पडून आहेत. मोठे बॉम्ब आणि लवंगी तर सोडाच, फुलबाज्याही मिळेनाशा झाल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाआधीच दिल्लीची सर्व गोदामे फटाक्यांनी भरून गेली.
- एस. के. गुप्ता
नवी दिल्ली - दिवाळी सुरू झाली तरी दिल्लीच्या गोदामांमध्ये ५00 कोटी रुपयांचे फटाके पडून आहेत. मोठे बॉम्ब आणि लवंगी तर सोडाच, फुलबाज्याही मिळेनाशा झाल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाआधीच दिल्लीची सर्व गोदामे फटाक्यांनी भरून गेली. पण न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी कडक पावले उचलल्यामुळे फटाक्यांची दुकानेच उघडली नाहीत.
यावर्षी पोलिसांनी फटाक्यांच्या दुकानांना परवानेच दिले नाहीत. पण परवान्याशिवाय फुलबाज्या व पिस्तुले विकली जातात, तीही यंदा दिसत नाहीत. दिवाळीच्या १५ दिवस आधी न्यायालयाचा निर्णय झाला. त्यात हरित फटाक्यांनाच परवानगी देण्यात आली. आता ते आणायचे कोठून, हा प्रश्न दुकानदारांना पडला. त्यामुळे सोमवारपर्यंत कोणत्याच फटाके दुकानदाराला परवाना देण्यात आला नाही.
कॉन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रडर्सचे अध्यक्ष प्रवीण खंडेलवाल यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, दिल्लीचा सदर बाजार ही फटाक्यांचे सर्वात मोठी घाऊ क बाजारपेठ आहे. उत्तर भारतातील बहुसंख्य व्यापारी तेथूनच फटाके नेतात. पण इथे बंदी आल्याने ते व्यापारी अन्य राज्यांतून फटाके विकत घेत आहेत. त्यामुळे दिल्लीच्या घाऊ क व्यापाºयांचे किमान ५०० कोटी (पान १० वर)
फटाके तोंडानेच वाजवणार
सर्वोच्च न्यायालयाने कडक निर्बंधांनंतर दिल्लीतील अनेक लोकांनी यंदा तोंडानेच फटाके वाजवण्याचे ठरविले आहे. सहा हजार लोक यंदा एकत्र जमून अशा प्रकारे दिवाळी साजरी करणार आहेत. तोंडाने फटाक्यांचे आवाज काढायचे आणि आनंद साजरा करायचा, असे त्यांचे म्हणणे आहे. आवाज व हवेच्या प्रदूषणावर हा उत्तम उपाय असल्याने अशा तोंडी फटाक्यांना खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे.