देशातील ५०० इंजिनीअरिंग कॉलेजेस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 05:23 AM2017-12-10T05:23:57+5:302017-12-10T05:24:28+5:30

गेल्या तीन वर्षांत देशातील पाचशे अभियांत्रिकी महाविद्यालये बंद पडली असून, यापुढे नवीन महाविद्यालये सुरू करण्यासाठी राज्य सरकारांची संमती गरजेची असेल, अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

 500 engineering colleges closed in the country | देशातील ५०० इंजिनीअरिंग कॉलेजेस बंद

देशातील ५०० इंजिनीअरिंग कॉलेजेस बंद

googlenewsNext

संतोष ठाकूर/ लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : गेल्या तीन वर्षांत देशातील पाचशे अभियांत्रिकी महाविद्यालये बंद पडली असून, यापुढे नवीन महाविद्यालये सुरू करण्यासाठी राज्य सरकारांची संमती गरजेची असेल, अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.
लोकमतला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश जावडेकर म्हणाले की, ही महाविद्यालये सरकारने बंद केली नाहीत. विद्यार्थ्यांअभावी ती बंद पडली आहेत. कोणते महाविद्यालय केवळ पैसे कमावण्यासाठी उघडले आहे, हे माहीत असल्याने विद्यार्थी त्यात प्रवेश घ्यायला जात नाहीत. संपुआ सरकारच्या काळात वाटेल तशी महाविद्यालये सुरू झाली. वर्ग व हॉल उभे राहिले, पण शिक्षक व पायाभूत सोयी नव्हत्या. विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण आणि नोकºयाही मिळाल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थी संख्या कमी होऊन ही महाविद्यालये बंद पडली.
त्यामुळे यापुढे नवीन महाविद्यालय सुरू करण्यासाठी राज्यांची मंजुरी बंधनकारक आहे.

Web Title:  500 engineering colleges closed in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.