५०० भारतीय इसिसकडे

By admin | Published: June 1, 2016 03:53 AM2016-06-01T03:53:18+5:302016-06-01T03:53:18+5:30

इसिस या अतिजहाल दहशतवादी संघटनेला भारतात विशेष प्रभाव पाडता आला नसला तरी ताज्या आकडेवारीनुसार ४०० ते ५०० भारतीय या संघटनेच्या तात्त्विक विचारसरणीकडे

500 Indian Isis | ५०० भारतीय इसिसकडे

५०० भारतीय इसिसकडे

Next

नवी दिल्ली : इसिस या अतिजहाल दहशतवादी संघटनेला भारतात विशेष प्रभाव पाडता आला नसला तरी ताज्या आकडेवारीनुसार ४०० ते ५०० भारतीय या संघटनेच्या तात्त्विक विचारसरणीकडे आकर्षित झाल्याचे निष्पन्न झाले. गुप्तचर संस्थांनी लगेच छडा लावत त्यांचा विदेशात जाण्याचा डाव हाणून पाडला आहे.
इसिसकडे आकर्षित झालेल्या भारतीयांमध्ये बहुतांश युवक असून वेबसाईटवर नियमितपणे संवाद साधत काहींनी इराक आणि सिरियामध्ये कसे पोहोचायचे याबाबत इसिसच्या काही लोकांशी संपर्कही साधला होता. इसिसने जगभरात ठेवलेल्या लक्ष्याबाबतही त्यांनी चर्चा केली होती, अशी माहिती मिळाली आहे. त्यांच्या हालचालीमुळे गुप्तचर संस्था, राज्य पोलीस आणि राष्ट्रीय तपास संस्थेला सातत्याने सतर्क राहावे लागले. तपास संस्थांनी बहुतांश युवकांना ताब्यात घेत
त्यांची चौकशी केली असता कोणत्याही गंभीर प्रकरणांमध्ये न गुंतलेल्यांचे समुपदेशन करीत त्यांना सोडून दिले. (वृत्तसंस्था)1इसिसकडे आकर्षित झालेल्या भारतीय युवकांच्या भारतीय व्यवस्थेबद्दल फारशा तक्रारी नाहीत. त्यांच्यात लष्कर, सुरक्षा दलाबद्दल कोणतीही सूड भावना नसल्याचेही आढळून आले. त्यातील बुहतेकांनी शिक्षण, रोजगार आणि कुठेही जाण्याचे स्वातंत्र्य असल्याची कबुलीही दिली.
2जम्मू-काश्मीर, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, प. बंगाल, दिल्ली या राज्यांतील युवकांनी वेबवर आधारित कॉलिंग, मेसेजिंगचा वापर केला.
ट्रिलियन, लाईव्ह, टांगो, ग्रुप मी, व्हायबर, हाईक, टॉकरे यांच्यासारख्या चॅटअ‍ॅपच्या माध्यमातून तसेच फेसबुक आणि टिष्ट्वटरच्या माध्यमातून संपर्क ठेवला.
खिलाफतीचे युवकांवर गारूड
यापूर्वी जैश-ए - मोहम्मद, इंडियन मुजाहिदीन, लष्कर-ए- तोयबा, हिजबुल मुजाहिदीन आणि अन्य संघटनांकडे आकर्षित झालेले युवक आता इसीसकडे वळण्याच्या प्रयत्नात असल्याचे आढळून आले. तपाससंस्थांनी चौकशीअंती तसे विश्लेषण केले आहे.
अनेक भारतीय युवकांना इसिसचे आकर्षण वाटण्याचे कारण शरियत कायद्याच्या आधारावर खिलाफत राजवट आणण्याचे स्वप्न. पाश्चात्य राष्ट्रांनी मुस्लिमांवर वर्षानुवर्षे अत्याचार चालविल्याची भावना मुुस्लिमांमध्ये बळावत आहे.
आधुनिक जगात अनेक सामाजिक वाईट कृत्यांवर मात करण्यास इसिसच्या नेतृत्वातील खिलाफत राजवटच उपाय शोधू शकते, या विचाराने या युवकांवर गारुड घातले होते, असे तज्ज्ञाने म्हटले.
वेळीच अडकले गुप्तचर संस्थांच्या जाळ्यात...हिंसक कारवायांसाठी इसिसच्या भूभागात जाण्यासाठी प्रवासाची तयारी करण्यापूर्वीच गुप्तचर संस्थांनी अनेकांना ताब्यात घेत डाव उधळला. अलीकडेच एनआयएने दिल्लीत मुदब्बीर शेख याच्या नेतृत्वातील १८ सदस्यीय गटाच्या
मुसक्या बांधल्या. जूनच्या पहिल्या आठवड्यात त्यांच्याविरुद्ध पहिले दोन आरोपपत्र दाखल होईल. इसिसमध्ये प्रत्यक्षात भरती झालेल्या ४९ जणांना आतापर्यंत अटक झाली आहे. हे सर्वच जण हल्ले करण्याच्या किंवा इराक, सिरिया गाठण्याच्या पूर्व टप्प्यात होते.

Web Title: 500 Indian Isis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.