५०० मठ अन् मुख्यमंत्रिपद;कर्नाटकात हिंदू मतदारांची भूमिका निर्णायक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 09:17 AM2023-03-30T09:17:36+5:302023-03-30T09:18:27+5:30

मुख्यमंत्रिपद कोणत्या समुदायाकडे जाणार, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

500 Maths and Chief Ministership; Role of Hindu voters in Karnataka is decisive | ५०० मठ अन् मुख्यमंत्रिपद;कर्नाटकात हिंदू मतदारांची भूमिका निर्णायक

५०० मठ अन् मुख्यमंत्रिपद;कर्नाटकात हिंदू मतदारांची भूमिका निर्णायक

googlenewsNext

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा बुधवारी जाहीर झाल्या. विधानसभेच्या एकूण २२४ जागा असलेल्या राज्यात बहुमताचा ११३ हा आकडा गाठण्यासाठी भाजप, काँग्रेस आणि जनता दल (सेक्युलर) या तीन राजकीय पक्षांमध्ये प्रमुख लढत आहे. येथील राजकारण आणि समाजकारणात लिंगायत, वोक्कालिगा आणि कुरबा या समुदायांच्या वरचष्मा आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपद कोणत्या समुदायाकडे जाणार, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

ध्रुवीकरण कोणाच्या बाजूने? 

मतदारांमध्ये एकूण हिंदू ८४%, तर मुस्लीम १३% इतके आहेत. २०० मतदारसंघात हिंदू मतदारांची भूमिका निर्णायक असते. ऐन निवडणुकीआधी २४ मार्च रोजी बोम्मई सरकारने ओबीसी मुस्लीम समाजाला दिलेले ४% आरक्षण रद्द करून वोक्कालिगा समाजाचे कोटा ४%वरून ६% तर वीरशैव आणि लिंगायतांचा कोटा ५%वरून ७% इतका केला. यामुळे मतांचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता आहे. २२४ जागांपैकी ९० ते १०० मतदारसंघांत यांची मते प्रभावशाली ठरतात.

  • लिंगायतांच्या लहान-मोठ्या ५०० हून अधिक मठांची समाजावर घट्ट पकड
  • आजवर २२ मुख्यमंत्री होऊन गेले. त्यातील ८ मुख्यमंत्री लिंगायत समाजाचे होते. माजी मुख्यमंत्री बी. एस. येदुरप्पा हे या समाजाचे प्रमुख नेते आहेत. 
  • या निवडणुकीत प्रचाराची प्रमुख जबाबदारी भाजपने ८० वर्षे वयाच्या येदुरप्पा यांच्यावरच सोपविली आहे. विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हेही लिंगायत आहेत.

​​​​​​​मिळालेली मते?    %मध्ये

भाजप    १३२६८२८४    ३६.२२%
बसप    १०८५९२    ०.३०
सीपीआय    ४८७१    ०.०१%
सीपीएम    ८११९१    ०.२२%
    काँग्रेस    १३९३२५३१    ३८.०४%
    राष्ट्रवादी    १०४६५    ०.०३

Web Title: 500 Maths and Chief Ministership; Role of Hindu voters in Karnataka is decisive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.