द्वेष, अश्लीलता पसरविणाऱ्या ५०० वेबसाइट केल्या बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 07:00 AM2020-08-11T07:00:39+5:302020-08-11T07:00:45+5:30

दिल्ली पोलिसांची कारवाई; १८ महिन्यांत ५० सायबर गुन्हेगार गजाआड

500 websites promoting hate and pornography shut down | द्वेष, अश्लीलता पसरविणाऱ्या ५०० वेबसाइट केल्या बंद

द्वेष, अश्लीलता पसरविणाऱ्या ५०० वेबसाइट केल्या बंद

Next

- नितीन अग्रवाल 

नवी दिल्ली : अश्लिलता आणि व्देष पसरविणाºया जवळपास ५०० वेबसाइटला दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने टाळे ठोकले आहेत. गृहमंत्रालयाच्या सीसीपीडब्ल्यूसी आणि इतरांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

दिल्ली पोलिसांनी गत १८ महिन्यात जवळपास ५० सायबर गुन्हेगारांना गजाआड करण्यात यश मिळविले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्यापही काही वेबसाइटविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. यात काही सोशल मीडिया पोस्टचे यूआरएलही समाविष्ट आहेत. अन्य देशांच्या बंदी असलेल्या संघटनांकडून त्यांना चालविले जाते. या संघटना स्थानिक स्लिपर सेलच्या मदतीने सोशल मीडियावर हजारोंच्या संख्येने असे अकाउंट बनवितात. या माध्यमातून आक्षेपार्ह, राष्ट्रविरोधी आणि समाजात व्देष निर्माण करणाºया पोस्ट टाकल्या जातात.

सायबर सेलचे डीसीपी अनेष रॉय यांनी सांगितले की, समाजात व्देष पसरविणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जात आहे. अशा प्रकरणात ५० आरोपींवर कायदेशीर कारवाईही करण्यात आलेली आहे.

Web Title: 500 websites promoting hate and pornography shut down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.