काश्मीर खोऱ्यात आणखी २८ हजार सशस्त्र पोलीस रवाना; जनतेत घबराट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2019 06:28 AM2019-08-03T06:28:57+5:302019-08-03T06:29:06+5:30

काश्मीरच्या त्रिभाजनाच्या अफवा : विशेष दर्जा काढण्यात येण्याचीही चर्चा

5,000 more armed police leave Kashmir Valley; Panic in public | काश्मीर खोऱ्यात आणखी २८ हजार सशस्त्र पोलीस रवाना; जनतेत घबराट

काश्मीर खोऱ्यात आणखी २८ हजार सशस्त्र पोलीस रवाना; जनतेत घबराट

Next

यात्रेकरू व पर्यटकांना खोरे सोडण्याच्या सूचना

नवी दिल्ली/श्रीनगर : पाकिस्तानी दहशतवाद्यांपासून धोका असल्याचे कारण सांगून केंद्र सरकारने काश्मीर खोºयात शुक्रवारी आणखी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या २८0 कंपन्या (२८ हजार सशस्त्र पोलीस) पाठवल्याने श्रीनगर व संपूर्ण खोºयाला लष्करी तळाचे स्वरूप आले आहे. केंद्राने २५ जुलै रोजी १0 हजार सशस्त्र सैनिक पाठवले होते. याखेरीज काश्मीर खोºयात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ६५ हजार जवान तैनात असून, अमरनाथ यात्रेच्या निमित्ताने आणखी २0 बटालियन पाठवण्यात आल्या होत्या. सशस्त्र दलाचे सुमारे एक लाख पोलीस काश्मीर खोºयात आता असून, त्यामुळे तेथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काश्मीरमधील कायदा व सुव्यवस्था यासाठी तसेच दहशतवादी हल्ल्यांना तोंड देण्यासाठी इतके सशस्त्र पोलीस रवाना करण्यात आले आहेत, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. पण अचानक इतक्या सशस्त्र पोलिसांना तिथे पाठवण्याची गरज आता का भासावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अमरनाथ यात्रेकरू तसेच खोºयात फिरायला आलेले पर्यटक यांनी ताबडतोब तेथून निघावे, अशा सूचनाही केंद्रीय गृह मंत्रालयाने दिल्या आहेत. त्यामुळे पर्यटक व यात्रेकरूही घाबरून गेले असून, तेथून मिळेल त्या मार्गाने जम्मूकडे येण्यासाठी त्यांची घाई सुरू झाली आहे. दहशतवादी हल्ल्याचे कारण सांगून त्यांना तेथून निघून जाण्याच्या सूचना दिल्याने आपल्यावर लगेच हल्ले सुरू होतील की काय, अशी भीती त्यांना वाटत आहे. त्यातच अमरनाथच्या मार्गावर पाकिस्तानी बनावटीचे भूसुरुंग व शस्त्रे मोठ्या प्रमाणात आढळल्याचे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितल्याने तिथे प्रचंड घबराट आहे. सरकारने काश्मीर खोºयात इतकी घबराट का निर्माण केली आहे, इतके सशस्त्र सैनिक खोºयात अचानक का पाठवण्यात आले आहेत, याचे स्पष्टीकरण केंद्र सरकारनेही दिलेले नाही. त्यामुळे तिथे अनेक अफवा पसरल्या आहेत. जम्मू-काश्मीर राज्याचे त्रिभाजन करण्याचा सरकारचा विचार असल्याची अफवाही त्यात आहे. काश्मीर खोरे, जम्मू व लडाख असे त्रिभाजन करण्याची केंद्र सरकार तयारी करीत आहे, असे अनेकांना वाटत आहे.

 काश्मीरमध्ये इतके सशस्त्र पोलीस का पाठवण्यात येत आहेत आणि यात्रेकरू व पर्यटकांना काश्मीर खोरे सोडण्याच्या सूचना का देण्यात आल्या आहेत, असा सवाल विरोधी सदस्यांनी केला. पण त्यावेळी अन्य चर्चा सुरू असल्याने या विषयावर सरकारतर्फे काहीच उत्तर देण्यात आले नाही. अध्यक्षपदी बसलेल्या मीनाक्षी लेखी यांनी मूळ विषयावरील चर्चाच सुरू ठेवली. काहींच्या मते विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी इतके सशस्त्र पोलीस पाठवण्यात आले आहेत, तर पंतप्रधान मोदी १५ आॅगस्ट रोजी श्रीनगरमध्ये तिरंगा फडकावणार असल्याने इतकी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

दडपण आणण्याचा केंद्राचा डाव : मेहबूबा
काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी हे सारे त्रिभाजनासाठी तसेच ३५ (अ) व ३७१ कलम रद्द करण्यासाठी सुरू आहे का, असा सवालच केला आहे. त्यांचे वडील व नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनीही सशस्त्र दलाच्या इतक्या तुकड्या आता पाठवण्याचे कारण काय, असे विचारले आहे. खोºयात राहणाºया जनतेमध्ये घबराट पसरवण्याचा हा केंद्राचा डाव आहे. पण काश्मिरी जनतेवर लष्करी मार्गाने दबाव वा दडपण आणण्याचे केंद्राचे प्रपत्न यशस्वी होणार नाही, असे पीडीपीच्या प्रमुख व माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या. लोकसभेतही विरोधी सदस्यांनी हा विषय उपस्थित केला.

Web Title: 5,000 more armed police leave Kashmir Valley; Panic in public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.