मुस्लीम मुलींना विवाहासाठी देणार ५१ हजार , केंद्र सरकारची योजना : पदवीपर्यंत शिक्षण असणे मात्र आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 02:09 AM2017-10-14T02:09:37+5:302017-10-14T02:09:41+5:30

पदवीपर्यंचे शिक्षण पूर्ण करणा-या मुस्लीम मुलींना केंद्र सरकार ५१ हजार रुपये देणार आहे. मौलाना आझाद एज्युकेशन फाउंडेशनने दिलेला हा प्रस्ताव केंद्राच्या अल्पसंख्याक मंत्रालयाने मंजूर केला आहे.

 51 thousand for marriage to Muslim girls, the central government plans: To have degree education, however, it is necessary to have education | मुस्लीम मुलींना विवाहासाठी देणार ५१ हजार , केंद्र सरकारची योजना : पदवीपर्यंत शिक्षण असणे मात्र आवश्यक

मुस्लीम मुलींना विवाहासाठी देणार ५१ हजार , केंद्र सरकारची योजना : पदवीपर्यंत शिक्षण असणे मात्र आवश्यक

Next

नवी दिल्ली : पदवीपर्यंचे शिक्षण पूर्ण करणा-या मुस्लीम मुलींना केंद्र सरकार ५१ हजार रुपये देणार आहे. मौलाना आझाद एज्युकेशन फाउंडेशनने दिलेला हा प्रस्ताव केंद्राच्या अल्पसंख्याक मंत्रालयाने मंजूर केला आहे.
आपल्या मुलींच्या शिक्षणावर खर्च करण्याऐवजी त्यांचा लवकरच विवाह करून देण्याकडे मुस्लीम पालकांचा अनेकदा कल असतो. काही वेळा मुलगी अधिक शिकली, तर तिच्या अपेक्षा वाढतील, तिला शिक्षित मुलगा मिळण्यात अडचणी येतील, अशी भीतीही पालकांना वाटते. त्यामुळे शिक्षणावर खर्च करण्याऐवजी तिच्या विवाहासाठी पैसा जमविणे व खर्च करणे असाच विचार मुस्लीम मुलींचे पालक करतात. ते टाळण्यासाठी मुलींना अधिकाधिक शिक्षित करण्यासाठी मौलाना आझाद फाउंडेशनने शादी शगुन योजनेचा प्रस्ताव केंद्र सरकारपुढे ठेवला होता.
अल्पसंख्याक समाजातील मुलींनी अधिकाधिक शिक्षण घ्यावे आणि त्यांच्यात प्रगल्भता आल्यावर त्यांचे विवाह व्हावेत, या हेतूने ही योजना आहे. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना ही योजना सुरू करण्यात आली. मात्र, तेव्हा अल्पसंख्यांक समाजातील १२ वीपर्यंत शिक्षण पूर्ण करणाºया मुलींना विवाहाच्या वेळी ही रक्कम दिली जात असे. शादी शगुन योजना ही याच योजनेचा पुढचा भाग आहे. शगुन योजनेसाठी शिक्षणाची अट पदवी करण्यात आली आहे. अल्पसंख्याक खात्याचे मंत्री मुख्ताल अब्बास नक्वी यांनी ही माहिती दिली.

Web Title:  51 thousand for marriage to Muslim girls, the central government plans: To have degree education, however, it is necessary to have education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.