५१५ ‘चुकार’ आयपीएसवर कारवाई? गृहखात्याची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 02:02 AM2018-04-09T02:02:19+5:302018-04-09T02:02:19+5:30
अखिल भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) ५१५ अधिकाऱ्यांनी त्यांच्या मालमत्तांचा सन २०१६ वर्षासाठी सादर करायचा तपशील सादर केलेला नाही. त्यांच्यावर बढती नाकारली जाणे व व्हिजिलन्स क्लिअरन्स न मिळण्याची कारवाई होऊ शकते
नवी दिल्ली- अखिल भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) ५१५ अधिकाऱ्यांनी त्यांच्या मालमत्तांचा सन २०१६ वर्षासाठी सादर करायचा तपशील सादर केलेला नाही. त्यांच्यावर बढती नाकारली जाणे व व्हिजिलन्स क्लिअरन्स न मिळण्याची कारवाई होऊ शकते, अस संकेत गृहमंत्रालयाकडून दिले गेले.
त्यामध्ये महासंचालक व महानिरीक्षक या हुद्द्याच्या अधिकाºयांचाही समावेश आहे. ‘आयपीएस’ अधिकाºयांना आपल्या स्थावर मालमत्तेचा तपशील दरवर्षी ३१ जानेवारीपर्यंत सादर करावा लागतो. २०१६ या वर्षासाठीचा तपशील सादर करण्याची ३१ जानेवारी २०१७ ही तारीख टळून गेली. तीन महिन्यांनी ३१ मार्चपर्यंत आयपीएस सेवेतील ३,९०५ पैकी ३,३९० अधिकाºयांनी आपल्या स्थावर मालमत्तेचा तपशील सादर केला होता. ज्यांनी तसे केले नाही, त्या पोलीस अधिकाºयांवर गृहखाते कारवाई करण्याची शक्यता आहे.
ज्यांनी तपशील सादर केलेला नाही, त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागविण्याचे आदेश राज्य व केंद्रशासित प्रदेशांना केंद्रीय गृहखात्याने दिले आहेत.