बाेनस म्हणून दिला ५२ महिन्यांचा पगार; ‘एव्हरग्रीन मरीन’चे कर्मचारी झाले खूश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 12:18 PM2023-01-10T12:18:39+5:302023-01-10T12:19:02+5:30
कंपनीला गेल्यावर्षी तब्बल १.७० लाख काेटी रुपयांचा नफा झाला.
नवी दिल्ली : एखादी कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना बाेनस म्हणून किती रक्कम देते? रेल्वे ७८ दिवसांचा पगार देते. काही कंपन्या १ ते ६ महिन्यांच्या पगाराएवढा बाेनस देतात. मात्र, एका कंपनीने तब्बल ५२ महिन्यांचा पगार बाेनस म्हणून दिला आहे. ही कंपनी आहे एव्हरग्रीन मरीन कार्पाेरेशन.
‘एव्हरग्रीन’ ही कंपनी तैवानची आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने काही निवडक कर्मचाऱ्यांना ५२ महिन्यांचा पगार बाेनस म्हणून दिला आहे. कंपनीने स्टेलर बाेनस म्हणून एवढी रक्कम दिली आहे. मात्र,जे कर्मचारी तैवानमध्ये कार्यरत आहेत, त्यांनाच हा बाेनस मिळाला आहे. कंपनीला गेल्यावर्षी तब्बल १.७० लाख काेटी रुपयांचा नफा झाला. काेराेना महामारीमुळे गेल्या २ वर्षांमध्ये शिपिंग क्षेत्रात भरभराट आली आहे.
८ पट बाेनस तरीही भेदभावचा आराेप
कंपनीच्या शांघाय येथील कर्मचाऱ्यांना पगाराच्या ५ ते ८ पट बाेनस मिळाला आहे. त्यामुळे या लाेकांनी कंपनीवर भेदभाव केल्याची टीका केली आहे.
याच कंपनीचे जहाज अडकले हाेते
२०२१ मध्ये याच कंपनीचे एक अजस्त्र जहाज सुएझ कालव्यात अडकले हाेते. त्यावेळी ही कंपनी चर्चेत हाेती.