अपुऱ्या आरोग्यसेवेवर ५२% लोकसंख्या विसंबून; ग्रामीण आरोग्य केंद्रांची हजारो पदे रिक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 05:58 AM2021-06-14T05:58:22+5:302021-06-14T05:58:34+5:30

ग्रामीण आरोग्य केंद्रांची हजारो पदे रिक्त

52% of the population relies on inadequate healthcare | अपुऱ्या आरोग्यसेवेवर ५२% लोकसंख्या विसंबून; ग्रामीण आरोग्य केंद्रांची हजारो पदे रिक्त

अपुऱ्या आरोग्यसेवेवर ५२% लोकसंख्या विसंबून; ग्रामीण आरोग्य केंद्रांची हजारो पदे रिक्त

Next

- नितीन अग्रवाल
लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली : कोरोना महामारीत सर्वात जास्त फरफट झालेल्या महाराष्ट्रात ग्रामीण भागात राहणारे अपुऱ्या आरोग्य सेवेवर अवलंबून आहेत. गावात राहणाऱ्या ५२ टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्येसाठी आरोग्य केंद्रे मोठ्या प्रमाणावर कमी आहेत. गरजेच्या तुलनेत ४८ टक्के सामुदायिक आरोग्य केंद्रे, ७९ टक्के प्राथमिक आणि ७५ टक्के उपकेंद्रेच सुरू आहेत. तेथेही निम्मेच कर्मचारी आहेत.

आरोग्य सेवेवरील सरकारकडील अधिकृत आकडेवारीनुसार ग्रामीण भागात सरासरी ६,०६३ लोकसंख्येला सगळ्यात खालच्या स्तरावरील आरोग्य सेवा म्हणजे एक उपकेंद्र उपलब्ध आहे. ३५२९५ लोकांच्या आरोग्याची जबाबदारी एका प्राथमिक आरोग्य केंद्रावर आणि सरासरी २,३२,२१२ लोक फक्त एका सामुदायिक आरोग्य केंद्रावर आहे.

ग्रामीण आरोग्य आकडेवारीनुसार मार्च २०२० पर्यंत राज्यात ग्रामीण भागात एकूण १४१७० उपकेंद्रे असायला हवीत. पण प्रत्यक्षात १०६४७ सुरू आहेत. २३०९ प्राथमिक आरोग्य केंद्रांची गरज असताना फक्त १८२९ उपलब्ध आहेत. राज्यात सामुदायिक आरोग्य केंद्रांची संख्या २७८ होती. गरज होती ५७७ केंद्रांची. राज्यात गेल्या १५ दिवसात एकूण १९४ उपकेंद्रे आणि ४९ प्राथमिक आरोग्य केंद्रे वाढवली गेली. पण १०४ सामुदायिक आरोग्य केंद्रे कमी 
झाली.

अपुरी ग्रामीण आरोग्य व्यवस्था
पद                              कार्यरत     कमी    स्वीकृत पद 
एएनएम                १२८०४         १९६२         १४७६६
डॉक्टर्स                    २८४८      ७३९            ३५८७
विशेषज्ञ चिकित्सक        ३९९           ७१३          १११२
आयुष चिकित्सक      ५९          २१९             २७८
रेऑडिलॉजिस्ट           १०४       १७४          २७८
फार्मासिस्ट                 १९५८    १४९             २१०७
प्रयोगशाळा तंत्रज्ञ     १५७४     ५३३              २१०७
परिचारिका               ३१६५     ६६९              ३८३४
आरोग्य सहायक       ३००५      ६५३            ३६५८

Web Title: 52% of the population relies on inadequate healthcare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य