‘आप’सरकारचे जाहिरातींसाठी ५२६ कोटी
By admin | Published: July 3, 2015 04:08 AM2015-07-03T04:08:10+5:302015-07-03T04:08:10+5:30
दिल्लीतील आम आदमी पार्टी सरकारने (आप) माहिती आणि प्रचारासाठीच्या तरतुदीत केलेल्या वारेमाप वाढीवर विरोधी पक्षांनी हल्लाबोल करताना
नवी दिल्ली : दिल्लीतील आम आदमी पार्टी सरकारने (आप) माहिती आणि प्रचारासाठीच्या तरतुदीत केलेल्या वारेमाप वाढीवर विरोधी पक्षांनी हल्लाबोल करताना जनतेचा पैसा स्वत:च्या प्रचारासाठी खर्च करणे हा भ्रष्टाचारच असल्याचा आरोप गुरुवारी केला.
दिल्ली सरकारने केवळ माहिती व प्रचारासाठी ५२६ कोटी रुपयांची तरतूद केली असून गेल्या वर्षी या निधीतून फक्त २४ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते,अशी माहिती दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष
अजय माकन यांनी दिली.
सरकारने अर्थसंकल्पात विविध पायाभूत विकास कार्यांसाठीच्या तरतुदीत कपात केली आणि दुसरीकडे पक्ष कार्यकर्ते आणि सल्लागारांवर पैशांची उधळण
सुरू आहे. स्वत:च्या प्रचारावर एवढा पैसा खर्च करणे एकप्रकाराचा भ्रष्टाचारच नाही काय? असा सवालही काँग्रेस नेत्याने उपस्थित केला. (वृत्तसंस्था)