मनी लाँड्रिंगचे ५३ जणांवर खटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 04:34 AM2017-08-14T04:34:43+5:302017-08-14T04:34:46+5:30
५३ जणांविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये खटले सुरू करण्यात आले आहेत.
हरीश गुप्ता।
नवी दिल्ली : ५३ जणांविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये खटले सुरू करण्यात आले आहेत. यातील सारेच आरोपी ब्रिटनला पळून गेले आहेत. तथापि, त्यांच्यापैकी कोणाच्याही प्रत्यार्पणासाठी अंमलबजावणी संचालनालय अथवा गृहमंत्रालयाकडून विनंती आपल्याकडे आलेली नाही, अशी धक्कादायक माहिती परराष्टÑ मंत्रालयाने दिली आहे.
परराष्टÑ मंत्रालयाने म्हटले की, फक्त सीबीआयकडून विजय मल्ल्या यांच्या प्रत्यार्पणाची विनंती आपल्याला मिळाली. ती ब्रिटनला पाठविण्यात आली आहे. ब्रिटनसोबत भारताचा गुन्हेगार प्रत्यार्पण करार आहे. त्या करारानुसार, आपण त्यांच्याकडे आरोपींना परत पाठविण्याची मागणी करू शकतो. १९९२ साली करण्यात आलेला हा करार ‘भारत-ब्रिटन परस्पर कायदेशीर साहाय्य करार’ या नावाने ओळखला जातो.
मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याखाली किती जणांवर खटले भरण्यात आले आहेत, त्यापैकी किती जण फरार आहेत, तसेच विदेशात पळालेल्यांपैकी किती जणांना परत आणण्यासाठी गृहमंत्रालयाकडून विनंत्या आल्या आहेत, यासंबंधीचा तपशील परराष्टÑ मंत्रालयाकडे मागण्यात आल्या होत्या. त्याच्या उत्तरात ही माहिती मंत्रालयाने दिली आहे.
परराष्टÑ मंत्रालयाने म्हटले की, अंमलबजावणी संचालनालयाकडून ५३ जणांविरुद्ध खटल्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तथापि, त्यापैकी कोणत्याही आरोपीच्या प्रत्यार्पणाची विनंती आपल्याला अंमलबजावणी संचालनालय अथवा गृहमंत्रालयाकडून मिळालेली नाही.
>मनी लाँड्रिंगचा खटला सुरू असलेले व्यक्ती
अनिल जैन, यश दिलीप जैन, पुखराज आनंदमल मुथा, मुन्नीचंद एस. भंडारी, सुरेंद्रकुमार डुंगरवाल, अजित अन्नू कामथ, अमित खिचा, बिलाल हारुण गलानी, मदनलाल जैन, मीना मदनलाल जैन, परमेश्वर अर्जुन पारीख, जावेरी जैन, जयेश जैन, कावित केडिया, मुकेश जैन, इर्फान फर्निचरवाला, सुनील कोठारी, हर्षद मगनलाल मोदी, दीपक शेनॉय, संतोष नाईक, सर्फराज गोदिल, मुकुंदभाई, आश्विनभाई, पी. उमेशचंद्र, दीपककुमार विठ्ठल दास, पटेल आश्विन हरिभाई, अब्दुल करीम जाका, सत्यनारायण ताराचंद जाजू, विक्रम जयंतीलाल चोक्सी, राकेश श्यामलाल जरीवाला, सुरेंद्र सिंग सिद्धू, विनोद गंगाराम दत्त, उरितखिनबाम बुधीचंद्रा सिंग, कांगुजाम प्रेमजित सिंग, श्रीमती लोंगजाम निनगोल कांगुजाम ओंगबी एलिजाबेथ देवी, श्रीमती कांगुजाम सनाजाओबी देवी, मोहम्मद कोमिरुद्दीन, परमजित सिंग संधू, गुलशन माशील, विजय मल्ल्या, नितीश ठाकूर, पाशा सत्यनारायण, जगदीश अलगा राजा, अंजना चोक्सी, कौस्तुभ चोक्सी, रवींद्र देशमुख, अजित साटम, गंगाधरम जी. येळीगट्टी, विजय कोठारी, श्रीधर धनपाल, हरप्रीत सिंग, अमितकुमार.