५३७ राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाने हटविले; महाराष्ट्रातील पक्षांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 06:06 AM2022-09-14T06:06:06+5:302022-09-14T06:06:21+5:30
या २५३ पक्षांनी त्यांना पाठविलेल्या पत्राला प्रतिसाद दिला नाही. तसेच, २०१४ आणि २०१९ ची विधानसभा अथवा लोकसभेची एकही निवडणूक लढविली नाही.
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने मंगळवारी अस्तित्वात नसलेल्या, नोंदणीकृत, अपरिचित राजकीय पक्षांना यादीतून काढून टाकले आहे. याशिवाय २५३ अतिरिक्त पक्षांना निष्क्रिय म्हणून घोषित केले आहे. २५ मे २०२२ पासून ३३९ पक्षांविरुद्ध करण्यात आलेल्या या कारवाईमुळे यादीतून हटविण्यात आलेल्या पक्षांची संख्या ५३७ झाली आहे.
या २५३ पक्षांनी त्यांना पाठविलेल्या पत्राला प्रतिसाद दिला नाही. तसेच, २०१४ आणि २०१९ ची विधानसभा अथवा लोकसभेची एकही निवडणूक लढविली नाही. हे पक्ष यादीतून हटविले जातील आणि १९६८ अंतर्गत लाभ मिळण्यासाठी पात्र नसतील.
ते पक्ष अस्तित्वातच नाहीत
संबंधित राज्ये, केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रत्यक्ष पडताळणीनंतर किंवा संबंधित पक्षाच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठविलेल्या पत्राच्या अहवालाच्या आधारे हे दिसून आले की, नोंदणीकृत असलेले ८७ पक्ष अस्तित्वातच नाहीत. हे पक्ष बिहार, दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, तमिळनाडू, तेलंगणा आणि उत्तर प्रदेशातील आहेत.