जळगावात ५४ लाखांची बॅग लांबवली दुचाकीस्वारावर संशय: अजिंठा चौकातील घटना
By admin | Published: July 19, 2016 12:41 AM2016-07-19T00:41:01+5:302016-07-19T00:41:01+5:30
जळगाव: दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी कारची काच फोडून अतुल सुरेशचंद्र कोठारी (वय ३५ रा.सुपारी बाग, जामनेर) या व्यापार्याची ५४ लाख रुपये असलेली बॅग लांबवली. ही घटना सोमवारी दुपारी तीन वाजता अजिंठा चौकाजवळील एका टायरच्या दुकानासमोर घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Next
ज गाव: दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी कारची काच फोडून अतुल सुरेशचंद्र कोठारी (वय ३५ रा.सुपारी बाग, जामनेर) या व्यापार्याची ५४ लाख रुपये असलेली बॅग लांबवली. ही घटना सोमवारी दुपारी तीन वाजता अजिंठा चौकाजवळील एका टायरच्या दुकानासमोर घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अतुल कोठारी यांचा धान्य खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. व्यवसायासाठी लागणारे पैसे काढण्यासाठी सोमवारी ते कार क्र.एम.एच.१९ बी.यु.८०८७ घेऊन जळगावात आले होते. कोठारी कार्पोरेशन, प्रणव ट्रेडर्स व प्रकाशचंद्र किसनलाल कोठारी आदी प्रत्येक नावाचे दोन असे प्रत्येकी ९ लाखांचे सहा धनादेश त्यांनी काव्यरत्नावली चौकातील एचडीएफसी बॅँकेच्या मुख्य शाखेत वटविण्यासाठी जमा केले.अडीच वाजता त्या धनादेशाची एकूण ५४ लाखांची रोकड ताब्यात घेतली. ही रोकड हिरव्या रंगाच्या बॅगेत ठेवून ती बॅग कारमध्ये ठेवली. ते जामनेरला जाण्यासाठी निघाले असता आकाशवाणी चौकापासून त्यांचा पाठलाग करीत आलेल्या दुचाकीवरील दोन जणांनी त्यांना कार पंर झाल्याचे सांगितले. मात्र कोठारी यांनी त्याकडे दुर्लक्ष करत कार अजिंठा चौकाजवळील राजेंद्र टायर्स या पंरच्या दुकानावर नेली. तेथे ओळखीच्या व्यक्तीशी बोलत असतानाच त्यांच्या कारमधून ही रक्कम लांबविण्यात आली. मात्र कोठारी यांच्या ध्यानात ही बाब आलीच नाही. कारच्या मागील डाव्या बाजूचा काच फोडून सीटवरील रोकड असलेली बॅगही गायब करण्यात आलेली असल्याचे आढळून आले. हे लक्षात येताच कोठारी यांनी नजिकच्या एमआयडीसी पोलीस स्टेशनला धाव घेवून तक्रार दाखल केली.