दिल्ली हादरली! भुकंपानंतर नागरिक घरातून बाहेर पळाले, तीव्रता ५.४ रिश्टर स्केल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 10:35 PM2022-11-12T22:35:21+5:302022-11-12T22:38:01+5:30
दिल्लीसह नोएडा आणि गुरुग्राम येथील लोकांनाही भूकंपाची तीव्र धक्का बसला आहे
दिल्ली एनसीआरमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के बसले आहेत. एकाच आठवड्यात दिल्ली आणि आजुबाजूच्या परिसरातील भूकंपाची ही दुसरी घटना आहे. या भूकंपाची तीव्रता ५.४ रिक्श्टर स्केल एवढी नोंद करण्यात आली आहे. यावेळीही भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळच होता. भूकंपाचा आवाज आल्यानंतर लोकांनी घरातून आणि उंच उंच इमारतीतून बाहेर पलायन केल्याचं पाहायला मिळालं. या घटनांमुळे लोकांच्या मनात भीती बसली आहे.
दिल्लीसह नोएडा आणि गुरुग्राम येथील लोकांनाही भूकंपाची तीव्र धक्का बसला आहे. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी ७.५८ वाजता हा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. भूकंपाचा केंद्र जमीनीपासून १० किमी खोल असल्याचे विभागाने ट्विटद्वारे म्हटले आहे.
Earthquake of Magnitude:5.4, Occurred on 12-11-2022, 19:57:06 IST, Lat: 29.28 & Long: 81.20, Depth: 10 Km ,Location: Nepal, for more information Download the BhooKamp App https://t.co/EeajzoWKi2@OfficeOfDrJS@PMOIndia@DDNational@Ravi_MoESpic.twitter.com/QsUzaSduQv
— National Center for Seismology (@NCS_Earthquake) November 12, 2022
दरम्यान, यापूर्वी ९ नोव्हेंबर रोजी दिल्ली एनसीआरमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले होते. त्यावेळी, रात्री १.५७ वाजता हे धक्के बसले होते.