बिहारमध्ये माओवाद्यांच्या गडात ५५ टक्के मतदान
By admin | Published: October 16, 2015 11:31 PM2015-10-16T23:31:31+5:302015-10-16T23:31:31+5:30
धमक्यांना न घाबरता मतदारांनी नक्षल्यांच्या गड मानल्या जाणाऱ्या सहा जिल्ह्णांतील ३२ विधानसभा मतदारसंघात ५५ टक्के मतदानातून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
पाटणा : धमक्यांना न घाबरता मतदारांनी नक्षल्यांच्या गड मानल्या जाणाऱ्या सहा जिल्ह्णांतील ३२ विधानसभा मतदारसंघात ५५ टक्के मतदानातून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शुक्रवारी शांततापूर्ण वातावरणात ४५६ उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये बंद झाले.
कैमूरमध्ये सर्वाधिक ५७.८६ टक्के, रोहतास ५४.६६, अरवल ५३.२१ जहानाबादमध्ये ५६.४९, औरंगाबाद ५२.५० तर गया जिल्ह्णात ५५.५४ टक्के मतदानाची नोंद झाल्याचे बिहारचे मुख्य निवडणूक अधिकारी अजय व्ही. नायक यांनी सांगितले. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मतदान ३ टक्क्यांनी वाढले. दुसऱ्या टप्प्यात सर्वाधिक मतदानाची नोंद कैमूरमध्ये झाली असली तर गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदान २ टक्के कमीच झाले.(वृत्तसंस्था)