एका लग्नाची गोष्ट! 55 वर्षीय नवरदेव आणि 25 वर्षांची वधू; सर्वच करताहेत या विवाहाचं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 02:26 PM2023-05-04T14:26:51+5:302023-05-04T14:32:44+5:30
नवरदेवाचे वय 55 वर्षे आहे आणि नववधूचे वय त्यापेक्षा निम्मे म्हणजेच 25 वर्षे आहे. पण असं असताना तरुणीशी लग्न करणाऱ्या 55 वर्षीय व्यक्तीचे गावात भरभरून कौतुक होत आहे.
राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात झालेला एक विवाह सध्या चर्चेत आला आहे. कारण नवरदेवाचे वय 55 वर्षे आहे आणि नववधूचे वय त्यापेक्षा निम्मे म्हणजेच 25 वर्षे आहे. पण असं असताना तरुणीशी लग्न करणाऱ्या 55 वर्षीय व्यक्तीचे गावात भरभरून कौतुक होत आहे. दौसा जिल्ह्यातील लालसोटच्या नवरंग पुरा गावात राहणारा बल्लू राम उर्फ बलराम याचा विवाह नापाच्या बास येथे राहणाऱ्या विनितासोबत 3 मे रोजी मोठ्या थाटामाटात झाला. आता या लग्नाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात आहे.
लग्नामागचे कारणही आश्चर्यकारक असल्याचे सांगितले जात आहे. वधू अपंग असून तिला चालता येत नाही, तर बल्लू राम पूर्णपणे निरोगी आहे. गेल्या 31 वर्षांपासून बल्लू गावातील मंदिरात शंकराची पूजा करण्यात मग्न असून भोले बाबांवरील भक्तीमुळे त्यांच्या मनात लग्नाचा विचार कधीच आला नसल्याचे सांगण्यात आले. बल्लू रामला सात बहिणी आणि भाऊ आहेत, पण वयाच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कुटुंबीय आणि नातेवाईक बल्लूसाठी मुलगी शोधू लागले.
एके दिवशी बल्लूला कळले की नापाच्या बास येथे राहणारी विनीता अपंग आहे आणि तिचे लग्न होत नाही. अशा परिस्थितीत 31 वर्षे भोले बाबांची सेवा करणाऱ्या बल्लू रामने विनितासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. विनिताच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, विनिता 12 वर्षांची असताना अंगणातील झाडावरून खाली पडल्याने तिचा पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला होता. तिच्यावर वर्षानुवर्षे उपचार झाले, पण विनिताच्या पाठीच्या खालच्या भागाने काम करणे बंद केले. मुलीच्या अपंगत्वामुळे तिचे लग्न होऊ शकले नाही.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, तिच्यासाठी एक स्थळ आलं होतं. पण तो मुलगाही अपंग होता. अशा परिस्थितीत विनीता यांची काळजी कोण घेणार हा प्रश्न निर्माण झाला होता. मग बल्लू रामचं नातं आलं तेव्हा आम्ही होकार दिला. दोन्ही कुटुंबीयांनी बल्लू आणि विनीता यांचे नाते निश्चित केले आणि त्यानंतर 3 मे रोजी दोघांनीही पूर्ण विधी करून लग्न केले. या लग्नामुळे दोन्ही कुटुंबे तसेच संपूर्ण गावातील लोक खूप आनंदी आहेत. गावातील लोक बल्लू रामचे कौतुक करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"