चिंताजनक! देशभरात साडेपाच हजारांवर खवले मांजरांची शिकार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 05:54 AM2020-12-16T05:54:07+5:302020-12-16T06:57:29+5:30

तस्करी रोखण्यासाठी आता ॲक्शन प्लॅन

5500 pangolin hunted across the country | चिंताजनक! देशभरात साडेपाच हजारांवर खवले मांजरांची शिकार

चिंताजनक! देशभरात साडेपाच हजारांवर खवले मांजरांची शिकार

googlenewsNext

- गोपालकृष्ण मांडवकर

नागपूर : अत्यंत दुर्मीळ असलेल्या खवले मांजर या प्राण्याच्या शिकारीचा देशभरातील आकडा डोळे विस्फारायला लावणारा आहे. मागील ९ वर्षांत देशात ५,७६२ खवले मांजरांची शिकार झाल्याची एका संस्थेच्या अहवालातील आकडेवारी आहे. संघटित गुन्हेगारांच्या माध्यमातून या प्राण्याची विदेशात तस्करी होत असल्याचेही पुढे आले आहे. या दुर्मीळ प्राण्याची तस्करी रोखण्यासाठी वनविभाग आता विशेष ॲक्शन प्लॅन राबविणार आहे. 

राज्यात विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागात हा प्राणी आढळतो. त्यामुळे त्याच्या तस्करीचे आणि शिकारीचे प्रमाणही याच भागात अधिक आढळते. या प्राण्याच्या शिकारी केवळ मांस खाण्यासाठी होतात की यामागे संघटित तस्करांची टोळी आहे, याचा अभ्यास ही समिती करणार आहे. ‘ट्रॅफिक’ या संस्थेने केलेल्या अभ्यासामध्ये २००९ ते २०१७ या काळात ५,७६२ खवले मांजरांची शिकार झाल्याची नोंद आहे. नागपूर जिल्ह्यात १९ मे रोजी पेंच व्याघ्र प्रकल्पातील चोरबाहुली वन परिक्षेत्रात वनविभागाच्या पथकाने शिजवायला घातलेल्या मांसासह दोन आरोपींना अटक केली होती. 

तस्करी होते विदेशात
खवले मांजराची तस्करी विदेशात होते. त्याच्या पाठीवरील खवल्यांपासून तयार केल्या जाणाऱ्या पावडरचा वापर औषधासाठी केला जातो. चीनमध्ये त्याचा सर्वाधिक वापर होतो. यासोबतच मलेशिया, व्हिएतनाममध्येही या प्राण्याची तस्करी होते. एक लाख रुपयात एक प्राणी विकला जातो. प्रौढ खवले मांजराचे वजन एक किलो असते. 

तांत्रिक गटाची स्थापना
खवले मांजराच्या संरक्षण व संवर्धनासाठी वनविभागाकडून कृती आराखडा आखला जाणार आहे. वन्यजीव व्यवस्थापन, संशोधन व वन्यजीव गुन्हे क्षेत्रातील तज्ज्ञांना समाविष्ट करून तांत्रिक गटाची स्थापना करण्यात आली आहे. पुणे येथील वन्यजीव वनसंरक्षक रमेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ७ सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. 

तांत्रिक गटाची स्थापना
खवले मांजराच्या संरक्षण व संवर्धनासाठी वनविभागाकडून कृती आराखडा आखला जाणार आहे. वन्यजीव व्यवस्थापन, संशोधन व वन्यजीव गुन्हे क्षेत्रातील तज्ज्ञांना समाविष्ट करून तांत्रिक गटाची स्थापना करण्यात आली आहे. पुणे येथील वन्यजीव वनसंरक्षक रमेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ७ सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. 

Web Title: 5500 pangolin hunted across the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.