छत्तीसगडमध्ये सापडल्या ५७ सुवर्णमुद्रा, रस्तेकामात आढळला हंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 04:15 AM2018-07-15T04:15:07+5:302018-07-15T04:15:15+5:30
छत्तीसगडमधील कांडागाव जिल्ह्यात रस्तेबांधणीसाठी खोदकाम सुरू असताना, तिथे १२व्या शतकातील तब्बल ५७ सुवर्णमुद्रा असलेला हंडा सापडला आहे.
रायपूर : छत्तीसगडमधील कांडागाव जिल्ह्यात रस्तेबांधणीसाठी खोदकाम सुरू असताना, तिथे १२व्या शतकातील तब्बल ५७ सुवर्णमुद्रा असलेला हंडा सापडला आहे. या सुवर्णमुद्रा यादवकालीन असल्याने त्याचा विदर्भाशीही संबंध आहे.
त्या काळात विदर्भात यादव साम्राज्य होते व यादवांनी दंडकारण्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बस्तरमधील सात जिल्ह्यांत आपले साम्राज्य वाढविले होते. तो भाग आता छत्तीसगडमध्ये आहे. कारकोई व बेडमा गावांच्या दरम्यान रस्त्याच्या कामात सुवर्णमुद्रा सापडल्या, असे जिल्हाधिकारी नीळकंठ टेकाम यांनी सांगितले. सरपंचाने हंडा त्यांच्या ताब्यात दिला आहे. (वृत्तसंस्था)
रस्त्यासाठी खोदकाम सुरू असताना, एका महिला कामगाराला
आतमध्ये हंडा सापडला. तिने लगेचच त्याची माहिती गावकºयांना दिली. प्राथमिक माहितीनुसार, या सुवर्णमुदा १२व्या वा १३व्या शतकातील आहेत. या मुद्रांवर जो मजकूर आहे, तो यादवकालीन आहे, असे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. पुरातत्त्व विभाग या सुवर्णमुद्रांची पाहणी करणार असून, त्यानंतर याविषयी अधिक माहिती मिळू शकेल, असे ते म्हणाले.