धक्कादायक! देहरादूनमध्ये 57 ट्रेनी IAS अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह, संस्था 3 डिसेंबरपर्यंत बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2020 10:09 PM2020-11-22T22:09:33+5:302020-11-22T22:10:42+5:30

अकादमीच्या अधिकाऱ्यांनी रविवारी 'भाषा'ला दिलेल्या माहितीनुसार, 57 ट्रेनी अधिकाऱ्यांना कोरनाची लागण झाल्याने संस्था 3 डिसेंबरपर्यंत बंद राहील.

57 trainee ias officer corona positive institute closed until 3 december  | धक्कादायक! देहरादूनमध्ये 57 ट्रेनी IAS अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह, संस्था 3 डिसेंबरपर्यंत बंद

धक्कादायक! देहरादूनमध्ये 57 ट्रेनी IAS अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह, संस्था 3 डिसेंबरपर्यंत बंद

Next

देहरादून - संपूर्ण देशात कोरोना महामारीचा हाहाकार सुरू आहे. आता ही आग देहरादून येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासनिक अकादमीपर्यंत (Lal Bahadur Shastri National Academy of Administration) पोहोचली आहे. येथील 57 ट्रेनी अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मोठ्या संख्येने संक्रमण पसरल्याने  तीन डिसेंबरपर्यंत संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अकादमीच्या अधिकाऱ्यांनी रविवारी 'भाषा'ला दिलेल्या माहितीनुसार, 57 ट्रेनी अधिकाऱ्यांना कोरनाची लागण झाल्याने संस्था 3 डिसेंबरपर्यंत बंद राहील. तसेच यादरम्यान प्रशिक्षणासह सर्व प्रकारचे कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीनेच केले जातील. त्यांनी सांगितले, की शुक्रवारपासून आतापर्यंत 57 ट्रेनी अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे आणि त्या सर्वांना विशेष पद्धतीने तयार केलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये वेगळे ठेवण्यात आले आहे. शुक्रवारपासून आजपर्यंत अकादमीत 162 आरटी पीसीआर टेस्ट (RT PCR Test) करण्यात आल्या. ट्रेनी अधिकारी आणि स्टाफ सदस्यांकडून सोशल डिस्टंसिंग ठेवणे, सातत्याने हात धुणे आणि मास्क लावण्यासंदर्भातील प्रोटोकॉलचे सातत्याने पालन केले जात आहे. 

देहरादूनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 20 हजारच्या जवळ पोहोचली - 
कोविड 19 इंडियानुसार, उत्तराखंडमध्ये कोरोना व्हायरसच्या एकूण रुग्णांची संख्या 70,790 वर पोहोचली आहे. यांपैकी 1146 जणांचा मृत्यू झाला आहे. तर देहरादूनमध्ये आतापर्यंत 1.9 लाख टेस्ट झाल्या असून संक्रमितांचा आकडा 19920 वर पोहोचला आहे. तर येथे देहरादून जिल्ह्यात आतापर्यंत 635 जणांनी आपला जीव गमावला आहे. 

भारतात कोरोना रुग्णांची संख्या 91 लाखांच्या जवळ पोहोचली आहे. देशात कोरोनामुळे आतापर्यंत तब्बल 1 लाख 33 हजार 282 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशातील सक्रीय रुग्णांची संख्या 4 लाख 40 हजार 708 एवढी आहे. तर 85 लाख 21 हजार 465 जण बरेही झाले आहेत.

गेल्या 6 दिवसांतील दिल्लीतील मृतांचा आकडा  -
21 नोव्हेंबर - 111 
20 नोव्हेंबर - 118
19 नोव्हेंबर - 98
18 नोव्हेंबर - 131 
17 नोव्हेंबर  - 99
16 नोव्हेंबर - 99

जसलोक रुग्णालयाचे डॉक्टर राजेश पारिख म्हणाले, ही तिसरी लाट आहे, असे मला वाटत नाही. सध्या ही पहिलीच लाट आहे. जेव्हा पहिल्या लाटेत कोरोना रुग्ण आढळणे पूर्णपणे बंद होईल, तेव्हाच दुसरी लाट अथवा तिसरी लाट म्हणता येईल. राहिला प्रश्न कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याचा, तर फेस्टिव्ह सीझनमध्ये आपण सावधगिरी बाळगायला हवी होती. मात्र, येथेच चूक झाली.

 

Web Title: 57 trainee ias officer corona positive institute closed until 3 december 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.