५७ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी दलाई लामांनी सोडले तिबेट
By admin | Published: March 17, 2016 09:54 AM2016-03-17T09:54:59+5:302016-03-17T10:08:57+5:30
चीन विरुद्धचा उठाव अयशस्वी झाल्यानंतर तिबेटचे धर्मगुरु दलाई लामा याच दिवशी १७ मार्च १९५९ रोजी भारतात येण्यासाठी निघाले होते.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ - चीन विरुद्धचा उठाव अयशस्वी झाल्यानंतर तिबेटचे धर्मगुरु दलाई लामा याच दिवशी १७ मार्च १९५९ रोजी भारतात येण्यासाठी निघाले होते. हिमालयीन पर्वतरागांमधून १५ दिवस पायी प्रवास करुन चीनी सैनिकांना चुकवत दलाई लामा भारतात दाखल झाले होते.
१७ मार्चला तिबेटची राजधानी ल्हासा सोडल्यानंतर त्यांच्या विषयी कोणतीही माहिती मिळत नव्हती. त्यांच्यासोबत २० जण होते. यात तिबेटचे सहा मंत्री होते. त्यांच्याविषयी कोणतीही माहिती मिळत नसल्यामुळे चीनी सैनिकांच्या सापळयात ते अडकले असा अनेकांनी तर्क काढला होता.
चीनी सैनिकांची नजर चुकवण्यासाठी त्यांना रात्रीच्यावेळी प्रवास करावा लागला. रात्रीच्यावेळी हिमालयातील अत्यंत प्रतिकुल वातावरणाचा सामना करत त्यांनी ब्रम्हपुत्रा नदी पार केली. अखेर खेनझिमना पास पार करुन ते भारतात दाखल झाले.