ईडीच्या १७ वर्षांत ५८७१ धाडी; २००५ ते २०२२ दरम्यानची कारवाई, २३ जण दोषी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 06:42 IST2022-03-22T06:42:26+5:302022-03-22T06:42:43+5:30

हवाला, विदेशी चलन अंतर्गत छापे

5871 raids in 17 years by ed between 2005 and 2022, 23 convicted | ईडीच्या १७ वर्षांत ५८७१ धाडी; २००५ ते २०२२ दरम्यानची कारवाई, २३ जण दोषी

ईडीच्या १७ वर्षांत ५८७१ धाडी; २००५ ते २०२२ दरम्यानची कारवाई, २३ जण दोषी

नवी दिल्ली : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) हवाला व्यवहार प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) आणि विदेशी चलन व्यवस्थापन कायद्यातील (एफईएमए-फेमा) तरतुदीनुसार एक एप्रिल, २०११ ते ३१ मार्च, २०२० कालावधीत अनुक्रमे १७५८ व १०२७ छापे घातले व तपास सुरू केला. पीएमएलएअंतर्गत ईसीआयआरची नोंद झालेली संंख्या १९९९, तर फेमाअंतर्गत १८००३ प्रकरणांत तपास सुरू करण्यात आला आहे.

पीएमएलए १ जुलै, २००५ पासून अमलात आला आहे. २८ फेब्रुवारी, २०२२ रोजी ९४३ प्रकरणांत प्रोस्युक्यूशन कम्प्लेंटस दाखल झाल्या असून त्या खटल्याच्या वेगवेगळ्या पायऱ्यांवर आहेत. १५ मार्च, २०२२ रोजी पीएमएलएअंतर्गत ट्रायल कोर्टसनी २३ आरोपींना हवाला व्यवहारांत दोषी ठरवले आणि केवळ एका प्रकरणात आरोपीची गुणवत्तेच्या आधारावर सुटका झाली आहे.

हवाला व्यवहारांचा तपास करताना पुरावे गोळा करण्यासाठी छापे खूप महत्त्वाचे आहेत. हवाला व्यवहारांना प्रतिबंध करण्यासाठी सरकार किती गंभीर आहे हे छाप्यांच्या वाढत्या संख्येवरून दिसते. तसेच तंत्रज्ञानाचा वापर करून, दोन संस्थांमध्ये सहकार्य आणि माहितीची देवाण-घेवाण करून आर्थिक गुप्त माहिती गोळा करण्यातील सरकारची बांधीलकी दिसते. देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रलंबित असलेल्या जुन्या प्रकरणांचा आणि गुंतागुंतीच्या हवाला व्यवहार प्रकरणांचा तपास करण्यासाठी सुनियोजितपणे प्रयत्न करण्यात आले. या सगळ्या प्रकरणांत अनेक आरोपी असल्यामुळे छाप्यांची संख्या वाढणार होती. छाप्यांचे प्रमाण वाढण्यामागे जी कारणे होती त्यापैकी हे एक होते.

घातलेले छापे, ईसीआयआरची नोंदणी, दाखल झालेल्या प्रोस्युक्यूशन कम्प्लेंटस आणि पीएमएलएअंतर्गत ठरलेले दोषी खालीलप्रमाणे.

कालावधी         घातलेले छापे    ईसीआयआरची झालेली नोंद   दाखल तक्रारी    दोषी            
०१-०७-२००५       ३०८६                    ४९६४                                ९४३                 २३
ते २८-०२-२०२२         

कोट्यवधी रुपये केले जप्त
२००४-१४ दरम्यान ११२ छाप्यांची कारवाई करण्यात आली. त्यातून गुन्ह्यांतील ५,३४६.१६ कोटी रुपये जप्त करण्यात आले व १०४ प्रोस्युक्यूशन कम्प्लेंटस दाखल करण्यात आल्या. 
२०१४-२२ दरम्यान २९७४ छापे घालण्यात  आले. यातून गुन्ह्यातील ९५,४३२.०८ कोटी रुपये जप्त करण्यात येऊन ८३९ प्रोस्युक्यूशन कम्प्लेंटस दाखल करण्यात आल्या.

Web Title: 5871 raids in 17 years by ed between 2005 and 2022, 23 convicted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.