5G Internet: भारतात लवकरच 5G सुरू होणार, केंद्राची स्पेक्ट्रम लिलावाला मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 02:10 PM2022-06-15T14:10:37+5:302022-06-15T14:10:45+5:30
5G Internet Service: 8 जुलैपासून 5G स्पेक्ट्रम लिलावासाठी अर्ज मागवले जातील आणि 26 जुलै रोजी याचा लिलाव होईल.
5G Internet Service: भारतात लवकरच 5G इंटरनेट सेवा सुरू होणार आहे. सरकारने त्याच्या लिलावास मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी ही घोषणा केली. 5G स्पेक्ट्रम लिलावासाठी 8 जुलैपासून अर्ज सुरू होतील आणि 26 जुलैपासून लिलाव सुरू होईल. यावर्षी ऑक्टोबरपासून 5G सेवा सुरू करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
The beginning of a new era for Indian Telecom.
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) June 15, 2022
5G spectrum auction announced. #BharatKa5G
सरकारने काय माहिती दिली
केंद्रीय मंत्रिमंडळाने 5जी स्पेक्ट्रमच्या लिलावाला परवानगी दिली आहे. यामध्ये 72 GHz वरील स्पेक्ट्रमचा 20 वर्षांच्या कालावधीसाठी लिलाव केला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 5G स्पेक्ट्रमबाबत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. अश्विनी वैष्णव म्हणाले, “देशात 5G सेवा लवकरच सुरू होणार आहे. 72 GHz वरील स्पेक्ट्रम, 4G पेक्षा सुमारे 10 पट वेगवान असेल."
5G spectrum auction details: https://t.co/7f0DA18hrd
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) June 15, 2022
Press release: https://t.co/Atf7umTUth#BharatKa5G
प्रसिद्धीपत्रक जारी
सरकारने जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने स्पेक्ट्रम लिलावासाठी दूरसंचार विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या अंतर्गत जनता आणि उद्योगांना 5G सेवा प्रदान करण्यासाठी यशस्वी बोली लावणाऱ्यांना स्पेक्ट्रम दिले जातील. लिलावात यशस्वी बोली लावणाऱ्या कंपनीला 20 हफ्त्यांमध्ये रक्कम भरण्याचा अवधी दिला जाईल. जुलै अखेरपर्यंत हा लिलाव होणार असून संबंधित करार हे 20 वर्षांच्या वैधतेसह एकूण 72097.85 मेगाहट्झ स्पेक्ट्रमसाठी असतील असं सरकारने स्पष्ट केलं आहे.