5G Launch in India: आता 'बफरिंग' विसरा... इंटरनेट होणार सुपरफास्ट; भारतात 5G चा शुभारंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2022 10:27 AM2022-10-01T10:27:32+5:302022-10-01T11:39:27+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशात 5G सेवांचा शुभारंभ करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या हस्ते देशात 5G सेवांचा शुभारंभ करण्यात आला. 1 ऑक्टोबरपासून दिल्लीतील प्रगती मैदानावर 4 दिवसीय इंडिया मोबाइल काँग्रेस (India Mobile Congress) कार्यक्रमाला सुरूवात झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5G सेवेची सुरूवात केली. यावेळी त्यांच्यासोबत माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव, माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री देवुसिंह चौहान उपस्थित होते.
यावेळी त्यांना तीन टेलिकॉम कंपन्यांनी 5G सेवांचा डेमो दाखवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत यावेळी रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबांनी, एअरटेलचे प्रमुख सुनिल मित्तल, व्होडाफोन आयडियाचे कुमार बिर्ला देखील होते. याशिवाय आकाश अंबानी यांनीदेखील पंतप्रधानांना 5G सेवांची माहिती दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिओ पॅव्हेलियनमध्ये प्रदर्शित ट्रू 5G उपकरणे पाहिली आणि 'Jio-Glass' चा अनुभव घेतला.
आपण देशात 5G सेवा जरी उशिरा सुरू केली असली तरी देशभरात ती लवकर पूर्ण करणारे देश ठरणार आहोत. डिसेंबर २०२३ पर्यंत 5G ची चं जाळ संपूर्ण देशभरात पसवणार असल्याचं आश्वासन देत ही परवडणारी सेवा असेल असं आश्वासन अंबानी यांनी दिले.
आज देशात 5G सेवांचा शुभारंभ करण्यात आला ही देशासाठी अभिमानाची बाब असल्याचं मत अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केलं. मुकेश अंबानी यांनीही यावर्षी झालेल्या रिलायन्सच्या एजीएममध्ये दिवाळीपर्यंत Jio 5G सेवा सुरू होणार असल्याचे सांगितले होते. पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत देशभरात त्याचे रोलआउट केले जाईल. पॅन इंडिया 5G नेटवर्कच्या विस्तारासाठी कंपनी 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखत असल्याचेही त्यांनी म्हटले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ५ जी सेवेचा शुभारंभ, स्वतः 'जिओ-ग्लास' परिधान करून अनुभव घेतला #NarendraModi#5GLaunchpic.twitter.com/L15QP53J0U
— Lokmat (@lokmat) October 1, 2022
आज नव्या युगाची आज सुरूवात होत आहे. मुकेश अंबानी जसं म्हणाले त्याप्रमाणे 5G सेवांमुळे तरूणांसाठी अनेक संधी उपलब्ध होईल. आज आपल्याकडे असं नेतृत्व आहे जे तंत्रज्ञानाला समजतात याचा आम्हाला अभिमान आहे. हे देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचं आहे. मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा ई ग्राम आणणारेही तेही होते. उद्योगांच्या पाठिंब्यासाठीही ते पुढे येतात. मुकेश अंबानींनी 4G सेवेलाही गती दिली. कोरोनाच्या काळातही तंत्रज्ञानामुळे आपण जराही थांबलो नाही, असं मत मित्तल यांनी व्यक्त केलं. आज आपला देश उत्पादनाचा देश बनतोय. पंतप्रधानांनी स्टार्टअप इंडियाची घोषणा दिली. 5G मुळे येत्या काळात आणखी उद्योजक तयार होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दिल्ली, वाराणसी, मुंबईसह काही शहरामध्ये आजपासूनच 5G सेवा उपलब्ध होईल आणि मार्च २०२४ पर्यंत संपूर्ण देशात ही सेवा सुरू होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
दीर्घ काळापासून होती प्रतीक्षा
5G मुळे इंटरनेटचा स्पीड तर वाढणारच आहे, पण याशिवाय उत्तम टेलिकॉम सेवा आणि कॉल कनेक्टिव्हीटीही मिळेल. यामुळे ग्राहकांना उत्तम सेवेचा अनुभव घेता येणार आहे. 5G स्पेक्ट्रमच्या लिलावानंतर ही सेवा केव्हा सुरू केली जाणार याबाबत उत्सुकता होती. परंतु आता या सेवेची सुरूवात करण्यात आली आहे. संपूर्ण देशात ही सेवा सुरू होण्यासाठी काही काळ लागणार आहे. सध्या रिलायन्स जिओ आणि एअरटेल देशात 5G सेवा सुरू करणार आहेत. परंतु व्होडाफोन आयडियानं मात्र सेवांबाबत कोणतीही माहिती दिली नाही.