video : वृद्ध महिलेसह 6 मुलांचा लांडग्याच्या हल्ल्यात मृ्त्यू; BJP आमदाराने हाती घेतली बंदूक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 05:45 PM2024-08-26T17:45:26+5:302024-08-26T17:45:54+5:30
भाजप आमदार स्वतः हातात बंदूक घेऊन रात्री गस्त घालत आहेत.
UP News : उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यात लांडग्यांची दहशत वाढली आहे. लांडगे अनेकांवर हल्ले करत आहेत. आतापर्यंत एक वृद्ध महिला आणि सहा लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. या लांडग्यांची दहशत एवढी आहे की, लोक भीतीने घरामध्ये लपून बसत आहेत. पोलिस आणि वनविभागाचे पथक लांडग्यांना हाकलण्यासाठी मोहीम राबवत असूनही, हल्ले थांबत नाहीत. अशातच, भाजप आमदार सुरेश्वर सिंह मैदानात उतरले आहेत. ते स्वतः हातात बंदूक घेऊन प्रत्येक गावात गस्त घालत आहेत. त्यांच्या गस्तीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
उत्तर प्रदेश के जिला बहराइच में भेड़ियों ने कल रात एक महिला को मार डाला। 50 दिन में ये भेड़िए 5 बच्चों सहित 7 को मारकर खा चुके हैं। BJP विधायक सुरेश्वर सिंह भी हाथ में बंदूक लेकर रात में पहरा देते हुए दिखे। लोगों में दहशत है। वे खेतों पर जाने से डर रहे हैं। pic.twitter.com/Ev6OY8s3jp
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) August 26, 2024
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील महसी परिसरात लांडग्यांची दहशत वाढली आहे. गेल्या दीड महिन्यात या लांडग्यांनी एका वृद्ध महिलेसह सहा लहान मुलांना आपले शिकार बनवले आहे. वनविभागाच्या पथकाने अथक परिश्रम करून तीन लांडगे पकडले, पण हल्ले अजून सुरुच आहेत. या लांडग्यांच्या हल्ल्याने वनविभाग, पोलीस आणि जिल्हा प्रशासनच, नाही तर आजूबाजूची गावेही हैराण झाली आहेत. आता खुद्द भाजप आमदार सुरेश्वर सिंह गावकऱ्यांसोबत बंदूक घेऊन रात्रभर पाळत ठेवताना दिसत आहेत.
लांडगे अद्याप पकडले गेले नाहीत
या लांडग्यांची दहशत एवढी आहे की, संध्याकाळी गावकरी भीतीने घरामध्ये लपून बसत आहेत. रविवारी रात्री आमदार सुरेश्वर सिंह परिसरातील ग्रामस्थांसह गस्तीसाठी बाहेर पडले. लांडग्यांना पकडण्याची व्यवस्था केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, लांडग्याच्या वेशात आणखी कोणी निष्पाप लोकांवर हल्ला करत आहे का, असा संशयही त्यांनी व्यक्त केला. त्यांनी याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.