जिवनदायीमुळे मिळाले ६ बालकांना जगण्याचे बळ २० बालकांवर कागदपत्राच्या पडताळणी नंतर शस्त्रक्रिया

By admin | Published: November 3, 2015 11:44 PM2015-11-03T23:44:59+5:302015-11-04T00:24:11+5:30

सितम सोनवणे लातूर : जिल्‘ातील ० ते १८ वयोगटातील ६ बालकांना हृद्य रोग असल्याचे तपासणीत निदर्शनास आले़ त्यांच्यावर ऑक्टोेबर महिन्यात पुण्याच्या एका खाजगी रुग्णालयता राजीव गांधी जिवनदायी योजने अंतर्गत शस्त्रक्रिया करण्यात आली़ तर दोन बालके शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले आहेत़त्यामुळे राजीव गांधी जीवनदायी योजनेमुळे बालकांना जगण्याचे बळ मिळाले आहे़

6 children who have got sacrificial power to survive 20 after childbirth verification | जिवनदायीमुळे मिळाले ६ बालकांना जगण्याचे बळ २० बालकांवर कागदपत्राच्या पडताळणी नंतर शस्त्रक्रिया

जिवनदायीमुळे मिळाले ६ बालकांना जगण्याचे बळ २० बालकांवर कागदपत्राच्या पडताळणी नंतर शस्त्रक्रिया

Next

सितम सोनवणे लातूर : जिल्‘ातील ० ते १८ वयोगटातील ६ बालकांना हृद्य रोग असल्याचे तपासणीत निदर्शनास आले़ त्यांच्यावर ऑक्टोेबर महिन्यात पुण्याच्या एका खाजगी रुग्णालयता राजीव गांधी जिवनदायी योजने अंतर्गत शस्त्रक्रिया करण्यात आली़ तर दोन बालके शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले आहेत़त्यामुळे राजीव गांधी जीवनदायी योजनेमुळे बालकांना जगण्याचे बळ मिळाले आहे़
जिल्‘ातील सर्व अंगणवाड्या व शाळेतील बालकांची आरोग्य तपासणी वेळोवेळी करण्यात येते़ या प्रथमिक तपासणीतील १२० बालकांच्या हृद्याची तपासनी हृद्यरोग दिनानिमित्य लातुरातील एका खाजगी रुग्णालयात पुण्याचे हृद्यरोग तज्ज्ञ डॉ़ पंकज सुगावकर यांनी टुडीइको तपासणी केली ़ यातपासणीत २८ बालकांना हृद्यरोग असल्याचे निदर्शनास आले़ त्यांच्याहृद्यावर शस्त्रक्रिया करणे गरजेजे असल्याचे निष्पन्न झाले़ त्यामुळे या २८ बालकांनवर राजीव गांधी जिवनदायी योजने अंतर्गत शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित केले़ यातील ६ बालकांची शस्त्रक्रिया पुर्ण झाली आहे़ तर दोन बालके शस्त्रक्रियेसाठी दाखल झाले आहे ़ २० बालकांच्या पालकांचे तसेच त्यांच्या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असणार्‍या कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर त्यांची जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून पडताळणी करण्यात येते़ कागदपत्राची पुर्तता पुर्ण होताच त्यांची माहिती संबंधित रुग्णालयास कळवून त्यांना शस्त्रक्रियेसाठी चा दिनांक दिला जातो़ त्यानुसार त्यांच्यावर पुण्याच्या खाजगी रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांकडून हृद्याची शस्त्रक्रिया केली जाते़ ज्या बालकांना हृद्यरोग आहे त्या पालकांनवर दु: खाची गडद छाया पडली होती़ त्या पालकांचे या योजनेमुळे दु:खच हारले आहे़ ज्या पालकांची अर्थिंक परिस्थिती सर्वसामान्य आहे त्यांना मोठा आधार मिळाला असून बालकांना हृद्यरोग शस्त्रक्रियेमुळे बालकांनाही आता जगण्याचे बळ मिळाले आहे़
जिल्‘ातील २८ बालकांची निवड़़़
हृद्याचा आजार असनारे जिल्‘ातील २८ बालकांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली आहे़ त्यातील ६ बालकांवार नुकतीच शस्त्रक्रिया झाली आहे़ तर दोघाबालकांना शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले आहे़ अन्या २० बालकांना लवकरच शस्त्रक्रियेसाठी पुण्याला पाठवले जाणार आहे़ या सर्व प्रक्रियेसाठी समन्वयक म्हणून गजानन लाडेकर यांच्याकडे जबाबदारी दिली आहे़ यासर्व बालकांच्या शस्त्रक्रियेचे नियोजन राजीव गांधी जिवनदायी योजने अंतर्गत केले जात असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ कैलास दुधाळ यांनी दिली़

Web Title: 6 children who have got sacrificial power to survive 20 after childbirth verification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.