पठाणकोट हल्याचा खर्च म्हणून केंद्राने पाठवलं 6 कोटी 35 लाखांच बिल

By admin | Published: March 7, 2016 02:31 PM2016-03-07T14:31:19+5:302016-03-07T14:31:19+5:30

पठाणकोट दहशतवादी हल्यात दहशतवाद्यांशी सामना करण्यासाठी केंद्राने निमलष्करी दलाच्या तुकड्या पाठवल्या होत्या, त्याचा खर्च 6 कोटी 35 लाखांच बील पाठवण्यात आलं आहे

6 crore 35 lakh bills sent to the Center for the cost of Pathankot | पठाणकोट हल्याचा खर्च म्हणून केंद्राने पाठवलं 6 कोटी 35 लाखांच बिल

पठाणकोट हल्याचा खर्च म्हणून केंद्राने पाठवलं 6 कोटी 35 लाखांच बिल

Next
>ऑनलाइन लोकमत - 
चंदिगड, दि. ७ - पठाणकोट दहशतवादी हल्याचा खर्च म्हणून केंद्राने पंजाब सरकारला चक्क बील पाठवलं आहे. पठाणकोट दहशतवादी हल्यात दहशतवाद्यांशी सामना करण्यासाठी केंद्राने निमलष्करी दलाच्या तुकड्या पाठवल्या होत्या, त्याचा खर्च 6 कोटी 35 लाखांच बील पाठवण्यात आलं आहे. पंजाब सरकारने मात्र हे बील भरण्यास पुर्णपणे नकार दर्शवला आहे. 
 
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्ताप्रमाणे 20 जानेवारीला केंद्राने पंजाब सरकारला पत्र पाठवलं आहे. या पत्रात नमूद केल्याप्रमाणे पठाणकोट दहशतवादी हल्याच्या पार्श्वभुमीवर 2 जानेवारी ते 27 जानेवारीदरम्यान पठाणकोट आणि जवळच्या परिसरात निमलष्करी दलाच्या 20 तुकड्या पाठवण्यात आल्या होत्या. ज्यांचा खर्च 6 कोटी 35 होत आहे तो भरण्यात यावा असं सागण्यात आलं आहे. 
 
पत्रात लिहिल्याप्रमाणे प्रत्येक तुकडीचा दिवसाचा खर्च 1,77,143 रुपये आहे. दहशतवादी हल्यादरम्यान सीआरपीएफच्या 11 तर बीएसएपच्या 9 तुकड्या पाठवण्यात आल्या होत्या. केंद्राने पंजाब सरकारला प्रवासखर्चदेखील देण्यास सांगितलं आहे. एनडीए सरकारचाच भाग असलेल्या अकाली दलने मात्र हे बील भरण्यास नकार दिला आहे. निमलष्करी दलाच्या पाठवण्यात आलेल्या तुकड्या राष्ट्रीय हितासाठी होत्या त्यामुळे त्याचा खर्च राज्य सरकारवर लागू करण्यात येऊ असं अकाली दलने सांगितलं आहे. 
 

Web Title: 6 crore 35 lakh bills sent to the Center for the cost of Pathankot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.