रुजवात पद्धतीमुळे 6 कोटी झाले वसूल जिल्हा मध्यवर्ती बँक; मोहीम तीव्र करण्याचा संचालक मंडळाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2016 01:53 AM2016-02-17T01:53:41+5:302016-02-17T01:53:41+5:30

सोलापूर:

6 crore has been incurred due to Ruwaat method; Board's decision to expedite the campaign | रुजवात पद्धतीमुळे 6 कोटी झाले वसूल जिल्हा मध्यवर्ती बँक; मोहीम तीव्र करण्याचा संचालक मंडळाचा निर्णय

रुजवात पद्धतीमुळे 6 कोटी झाले वसूल जिल्हा मध्यवर्ती बँक; मोहीम तीव्र करण्याचा संचालक मंडळाचा निर्णय

Next
लापूर:
जिल्हा बँकेने सुरु केलेल्या रुजवात पद्धतीच्या वसुलीमुळे बँकेचे 5 कोटी 71 लाख 86 हजार रुपये वसूल झाले आहेत. ही मोहीम अधिक तीव्र करणार असल्याचे बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी सांगितले.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक थकबाकीमुळे आर्थिक अडचणीत सापडली आहे. बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी संचालक मंडळाच्या सहकार्यातून थकबाकी वसुलीची मोहीम तीव्र केली आहे. थकबाकी भरलेल्यांना लागलीच कर्ज देण्याचे अधिकार विकास सोसायटी पातळीवर देण्यात आले आहेत. मोठय़ा प्रमाणावर असलेली थकबाकी वसूल झाल्यानंतर वाढीव व नवीन सभासदांनाही कर्ज देण्याची तयारी बँकेने ठेवली आहे. थकलेले कर्ज वसूल करण्यासाठी ‘वन टाईम सेटलमेंट’ पद्धत अवलंबली आहे. यामुळे कर्जदाराला दुपटीपेक्षा अधिक कर्ज व व्याजाची रक्कम असेल तर दुप्पटच रक्कम भरावी लागणार आहे. शेतकर्‍यांना यामुळे सवलत मिळाली आहे. याशिवाय थकबाकी वसुलीसाठी रुजवात पद्धतही अवलंबली आहे. बँकेचे अधिकारी, सचिव थकबाकीदारांपर्यंत पोहोचले आहेत. आपल्याकडे कर्ज आहे याची जाणीव थकबाकीदाराला करुन देऊ लागले आहेत. यामुळे काही शेतकरी रक्कम भरु लागले आहेत.
0 बँकेच्या 197 शाखांकडील 1209 विकास सोसायट्यांचे 80 हजार 542 थकबाकीदार शेतकरी आहेत
0 या शेतकर्‍यांकडे 577 कोटी 98 लाख 76 हजार इतकी रक्कम थकली आहे
0 बँकेचे कर्मचारी 9 हजार 324 शेतकर्‍यांपर्यंत पोहोचले असून, त्यापैकी काही शेतकर्‍यांनी 5 कोटी 71 लाख 86 हजार रुपये इतकी रक्कम भरली आहे
चौकट
तोट्यातील शाखांमध्ये वाढताहेत ठेवी
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 219 पैकी 70 पेक्षा अधिक शाखा तोट्यात आहेत. ठेवीची रक्कम कमी आहे, वसुलीही नाही व व्यवहारही वाढत नाही. या तोट्यातील शाखांचा आढावा घेतला जात असून, काही बंद व काही स्थलांतरित केल्या जाणार आहेत. हा निर्णय घेण्यात येत असल्याने शाखामध्ये ठेवी वाढत असल्याचे सांगण्यात आले.
कोट
घेतलेल्या कर्जाच्या दुप्पट रक्कम भरणा केल्याने शेतकर्‍यांचाच फायदा होणार आहे. नव्याने एक लाखापर्यंत कर्ज घेणार्‍यांना बिनव्याजी व तीन लाखांपर्यंत कर्ज घेणार्‍यांना दोन टक्के व्याजाने पुन्हा कर्ज देणार आहोत. कर्ज भरले नाही तर त्यावर 13 टक्के व्याज सुरुच राहणार आहे.
राजन पाटील
अध्यक्ष, जिल्हा बँक

Web Title: 6 crore has been incurred due to Ruwaat method; Board's decision to expedite the campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.