सुरतमध्ये गॅस गळती; 6 कामगारांचा मृत्यू, 20 हून अधिक जणांची प्रकृती गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 08:34 AM2022-01-06T08:34:56+5:302022-01-06T08:36:36+5:30
Surat Chemical Leak : या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सूरत : गुजरातमधील सूरतमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. येथील सचिन जीआयडीसी भागात केमिकलने भरलेल्या टँकरमधून केमिकल लीक (Chemical Leakage) झाल्याने 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 हून अधिक मजुरांचा श्वास गुदमरल्याने त्यांना सुरतच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन जीआयडीसीतील राजकमल चिकडी प्लॉट क्रमांक 362 च्या बाहेर 10 मीटर अंतरावर उभ्या असलेल्या केमिकलच्या टँकरपासून 10 मीटर अंतरावर मजूर झोपले होते. या घटनेत जखमी झालेल्या 20 हून अधिक जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. टँकरमधून केमिकल टाकले जात असताना हा अपघात झाल्याचे वृत्त आहे. सध्या 8 जण व्हेंटिलेटरवर आहेत. एक टँकर चालक नाल्यात विषारी केमिकल टाकत होता. यादरम्यान त्यातून विषारी केमिकलची गळती सुरू झाली.
Gujarat: Six people died and 20 others were admitted to the civil hospital after gas leakage at a company in Sachin GIDC area of Surat early morning today, says hospital's In Charge Superintendent, Dr Omkar Chaudhary pic.twitter.com/HVnH9CZHYl
— ANI (@ANI) January 6, 2022
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, सचिन परिसरात अनेक केमिकल कारखाने आहेत. याआधीही गुजरातमधील अहमदाबाद येथील एका कपड्याच्या कारखान्यात केमिकल वेस्ट टँक साफ करताना चार मजुरांचा मृत्यू झाला होता.