भगवंत मान यांच्यासह ६ जणांचा बुधवारी शपथविधी; शहीद भगतसिंग यांच्या गावात जोरदार तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 07:02 AM2022-03-14T07:02:01+5:302022-03-14T07:05:55+5:30

पंजाब मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह १८ आमदार मंत्री बनू शकतात.

6 including Bhagwant Mann sworn in on Wednesday; Intensive preparations in the village of Shaheed Bhagat Singh | भगवंत मान यांच्यासह ६ जणांचा बुधवारी शपथविधी; शहीद भगतसिंग यांच्या गावात जोरदार तयारी

भगवंत मान यांच्यासह ६ जणांचा बुधवारी शपथविधी; शहीद भगतसिंग यांच्या गावात जोरदार तयारी

Next

- तक्षक

चंडीगढ : पंजाबमध्ये शहीद भगतसिंग यांचे गाव खटखड कला येथे १६ मार्च रोजी होणार असलेल्या शपथविधी समारंभात आम आदमी पक्षाच्या (आप) विधिमंडळ पक्षाचे नेते भगवंत मान मुख्यमंत्रिपदाची व ६ आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील. या आमदारांत अमन अरोडा, हरपाल सिंग चीमा, कुलतार सिंग संधवा, हरजोत बैंस, बलजिंद्र कौर आणि कुंवर विजय प्रताप सिंग यांचा समावेश आहे. राज्यपाल बनवारीलाल पुरोहित ही शपथ देतील.

पंजाब मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह १८ आमदार मंत्री बनू शकतात. मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, तेव्हा आणखी ११ आमदारांना मंत्रीपद दिले जाईल. आपने पंजाबमध्ये ११७ सदस्यांच्या विधानसभेत ९२ जागा जिंकल्या. २०१७ मध्ये विधानसभा निवडणुकीत आपने २० जागा जिंकल्या होत्या. परंतु, ५ वर्षे पूर्ण होता होता ५ आमदारांनी पक्ष सोडला.  मुख्यमंत्री आणि १७ मंत्र्यांनी एकाच वेळी शपथ घ्यावी, असे पक्षश्रेष्ठींचे मत नाही. यामुळे मंत्रिमंडळाच्या विस्ताराची संधी मिळते. याबाबत बलवंत मान आधीच म्हणाले आहेत की, फक्त १७ आमदार मंत्री बनू शकतात. त्यामुळे मंत्री न बनणाऱ्या आमदारांनी नाराज होऊ नये.

हिमाचल प्रदेशात सर्व जागा लढविणार-

पंजाबमध्ये प्रचंड बहुमत मिळविल्यानंतर आम आदमी पार्टीने आता शेजारच्या हिमाचल प्रदेशातही पाय पसरण्याची तयारी शुरू केली असून, विधानसभेच्या सर्व ६८ जागांवर निवडणूक लढविणार आहे. हिमाचल प्रदेशात याचवर्षी डिसेंबरमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. 
 

Web Title: 6 including Bhagwant Mann sworn in on Wednesday; Intensive preparations in the village of Shaheed Bhagat Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.