केंद्र सरकारच्या कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात ६ % वाढ
By Admin | Published: September 9, 2015 01:49 PM2015-09-09T13:49:16+5:302015-09-09T13:52:48+5:30
केंद्र सरकारच्या कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात ६ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय केंद्रिय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ९ - केंद्र सरकारच्या कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात ६ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय केंद्रिय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे केंद्राच्या एक कोटी कर्मचारी व पेन्शनधारकांना फायदा मिळणार आहे.
सध्या सरकारी कर्मचा-यांना ११३ टक्के महागाई भत्ता मिळत होता, मात्र आता त्यात ६ टक्के वाढ करण्यात आल्याने तो आता ११९ टक्के होणार आहे. हा वाढीव भत्ता १ जुलै २०१५ पासूनच्या वेतनात लागू होईल. यापूर्वी सरकारने एप्रिल महिन्यात महागाई भत्त्यात वाढ केली होती.