आंध्र प्रदेशमधील ट्रेन दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू, ४० जखमी; PM मोदींचा रेल्वेमंत्र्यांना फोन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 10:49 PM2023-10-29T22:49:47+5:302023-10-29T23:07:08+5:30

१८ गंभीर जखमी प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

6 killed, 40 injured in train accident in Andhra Pradesh; PM Narendra Modi's call to Railway Minister | आंध्र प्रदेशमधील ट्रेन दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू, ४० जखमी; PM मोदींचा रेल्वेमंत्र्यांना फोन

आंध्र प्रदेशमधील ट्रेन दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू, ४० जखमी; PM मोदींचा रेल्वेमंत्र्यांना फोन

आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यात विशाखापट्टणमहून रायगडाकडे जाणारी पॅसेंजर ट्रेन रुळावरून घसरली. या रेल्वे अपघातात ६ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ४० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तसेच मृतांचा आणि जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. १८ गंभीर जखमी प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रेल्वेच्या जनसंपर्क अधिकार्‍यांनी सांगितले की, बचावकार्य सुरू असून रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. घटनास्थळावरून अनेक फोटो, व्हिडिओ समोर आली आहेत, ज्यामध्ये दोन गाड्यांमधील टक्कर झाल्याची ही घटना असल्याचे दिसून येत आहे.

सदर घटनेनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी बोलून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी दुखापतग्रस्तांना सर्वोतपरी मदत केली जात आहे, असं मोदींनी सांगितले. तसेच मोदींनी यावेळी शोक देखील व्यक्त केला आहे.

६ ठार, अनेक जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, या रेल्वे अपघातात दोन गाड्यांचा अपघात झाला आहे. बचाव पथक आपले काम करत आहे. या रेल्वे अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला असून काही लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश

मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी तातडीने मदत उपाययोजना करण्याचे आणि विशाखापट्टणम आणि विजयनगरमच्या जवळच्या जिल्ह्यांमधून शक्य तितक्या रुग्णवाहिका पाठवण्याचे आदेश दिले आहेत. जखमींना चांगले उपचार मिळावेत यासाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Web Title: 6 killed, 40 injured in train accident in Andhra Pradesh; PM Narendra Modi's call to Railway Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.