झारखंडमधील धनबाद येथे विजेच्या हायटेन्शन तारेच्या संपर्कात आल्याने ६ मजुरांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 04:18 PM2023-05-29T16:18:52+5:302023-05-29T16:19:09+5:30
Death News: झारखंडमधील धनबाद येथे एक भीषण दुर्घटना घडली आहे. हावडा-नवी दिल्ली रेल्वे मार्गावरील धनबाद आणि गोमो रेल्वेस्टेशनादरम्यान येणाऱ्या निचितपूर रेल्वे फाटकाजवळ ६ मजूर हायटेन्शन वायरच्या संपर्कात आले.
झारखंडमधील धनबाद येथे एक भीषण दुर्घटना घडली आहे. हावडा-नवी दिल्ली रेल्वे मार्गावरील धनबाद आणि गोमो रेल्वेस्टेशनादरम्यान येणाऱ्या निचितपूर रेल्वे फाटकाजवळ ६ मजूर हायटेन्शन वायरच्या संपर्कात आले. त्यामुळे झालेल्या भीषण दुर्घटनेत या सहा मजुरांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेच्या वृत्ताला दुजोरा देताना धनबादच्या डीआरएमनीं सांगितले की, सर्व मृत हे ठेकेदारीवरील मजूर होते. ही दुर्घटना २५ हजार व्होल्ट विजेच्या तारेच्या संपर्कात आल्याने घडली.
मिळालेल्या माहितीनुसार कतरास स्टेशनपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर स्थित असलेल्या झारखोर फाटकाजवळ पोल लावत असताना ठेकेदाराचे अनेक कर्मचारी करंटच्या संपर्कात आले. त्यामुळे या मजुरांचा मृत्यू झाला. हा अपगात पोल लावत असताना हायटेन्शन वायरच्या संपर्कात आल्याने झाला. या अपघातानंतर रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. तसेच या ट्रेन वेगवेगळ्या स्टेशनवर थांबवण्यात आल्या आहेत. या अपघातात अनेक जण गंभीररीत्या होरपळल्याचेही समोर आले आहे.
याचा परिणाम रेल्वेच्या वाहतुकीवरही झाला आहे. अनेक ठिकाणी गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले कामगार हे झारखंडमधीली पलामू आणि लातेहारबरोबरच उत्त्तर प्रदेशमधील संबंधित आहेत.