6 मेन्स, 4 इंटरव्ह्यू, 10 अटेंप्टमध्येही झालं नाही सिलेक्शन; IAS-IPS अधिकाऱ्यांनी दिला 'हा' सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 09:47 AM2022-12-18T09:47:15+5:302022-12-18T09:55:17+5:30

कुणालच्या ट्विटवरून UPSC उत्तीर्ण होऊन अधिकारी बनण्यासाठी उमेदवारांना किती मेहनत करावी लागते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे किती धैर्य आणि समर्पण आवश्यक आहे हे दिसून येते.

6 mains 4 interviews no selection even in 10 attempts ias ips officers gave this advice to kunal virulka | 6 मेन्स, 4 इंटरव्ह्यू, 10 अटेंप्टमध्येही झालं नाही सिलेक्शन; IAS-IPS अधिकाऱ्यांनी दिला 'हा' सल्ला

फोटो - झी न्यूज

googlenewsNext

जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करायची असं ठरवता तेव्हा तुमचं संपूर्ण लक्ष त्याकडे असतं. मग ते साध्य होईपर्यंत तुम्ही विचार करत राहता की ते कसे होईल? कसं करायचं. अशीच एक प्रेरणादायी घटना आता समोर आली आहे. कुणाल विरुलकरची या तरुणाला यूपीएससी पास करून भारत सरकारचा एक जबाबदार अधिकारी व्हायचे  आहे. कुणालने एक ट्विट केलं असून त्यात लिहिले आहे की, त्याने आतापर्यंत एकूण 10 वेळा प्रयत्न केला आहे. यामध्ये त्याने 6 वेळा मेन्स दिली आहे आणि 4 वेळा मुलाखतही दिली, पण एकदाही निवड झाली नाही. यासोबतच नशिबात काय लिहिले आहे ते कळत नाही, असंही म्हटलं आहे.

कुणालच्या या ट्विटवरून UPSC उत्तीर्ण होऊन अधिकारी बनण्यासाठी उमेदवारांना किती मेहनत करावी लागते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे किती धैर्य आणि समर्पण आवश्यक आहे हे दिसून येते. कुणालच्या ट्विटनंतर ज्यांनी UPSC पास केले आणि अधिकारी झाले त्यांनीही त्याला मोलाचा सल्ला दिला. कुणालच्या ट्विटवर आयपीएस अधिकारी दिपाशु काबरा यांनी लिहिलं आहे, तुझ्या नशिबात वेगळंच काही लिहिलं आहे. तू एक दिवस नक्कीच यशस्वी होशील.

आयपीएस अधिकारी सूरज सिंह परिहार यांनी लिहिलं, कुणाल, तू आयुष्यात नक्कीच काहीतरी मोठे आणि चांगले करशील, म्हणूनच मी आता तुला फॉलो केलं आहे. तसेच, त्याने आणखी एका ट्विटमध्ये लिहिले की, तुमचे नियोजन आणि अंमलबजावणी चांगली होती, त्यामुळेच तुम्ही इतक्या वेळा मुलाखतीला पोहोचलात. देवाचे नियोजन तुमच्यापेक्षा चांगले आहे, फक्त विश्वास ठेवा, संयम तुमच्यात आहे तरच तुम्ही 10 वेळा प्रयत्न करू शकता. 

IRS अधिकारी विवेक चौहान यांनी लिहिले, कुणाल तू चिकाटीचा आदर्श आहेस, तुझ्यासोबत काहीतरी चांगले घडेल, माझ्या शुभेच्छा तुझ्यासोबत आहेत. आयपीएस अधिकारी संतोष सिंह यांनी लिहिले की, यूपीएससी उत्तीर्ण होणे किंवा नाही हे केवळ क्षमतेचे मोजमाप नाही. UPSC उत्तीर्ण झाल्यानंतरही, प्रत्येक मोठे कार्य आपल्यासाठी परीक्षेसारखे असते, जिथे आपण नापास होतो, परंतु नंतर पुढील ध्येयाकडे वळतो. तुमच्यासाठी UPSC पेक्षा चांगले काहीतरी आहे यावर विश्वास ठेवा. हार्दिक शुभेच्छा! एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: 6 mains 4 interviews no selection even in 10 attempts ias ips officers gave this advice to kunal virulka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.