लुधियानात अमोनिया गळतीमुळे ६ जणांचा मृत्यू

By admin | Published: June 13, 2015 09:26 AM2015-06-13T09:26:11+5:302015-06-13T09:51:14+5:30

लुधियाना येथील दोराहा बायपास रोडजवळ एका टँकरमधन अमोनिया गळतीमुळे विषबाधा होऊन सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर १०० हून अधिक नागरिक जखमी झाले.

6 people die due to ammonia leak in Ludhiana | लुधियानात अमोनिया गळतीमुळे ६ जणांचा मृत्यू

लुधियानात अमोनिया गळतीमुळे ६ जणांचा मृत्यू

Next
>ऑनलाइन लोकमत
लुधियाना, दि. १३ -  लुधियाना येथील दोराहा बायपास रोडजवळ एका टँकरमधन अमोनिया गळतीमुळे विषबाधा होऊन सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर १०० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. अमोनिया गळतीमुळे अनेक जण बेशुद्ध झाले, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वायुगळती झाल्याची बातमी कळताच अनेक लोक घरातून बाहेर पडले, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली व संपूर्ण गाव रिकामं करण्यात आलं.
दोराहा बायपास रोडजवळील असलेल्या एका फ्लायओव्हरच्या खाली हा टँकर फसला आणि त्यातून वायुगळती सुरू झाली. विषारी वायुच्या संपर्कात आल्याने सहा जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जणांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला, त्यांच्यावर दोराहा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Web Title: 6 people die due to ammonia leak in Ludhiana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.