आत्महत्येपूर्वी ६० पानी ‘लेटरबॉम्ब’!

By admin | Published: February 19, 2017 01:49 AM2017-02-19T01:49:46+5:302017-02-19T01:49:46+5:30

अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कालिखो पुल यांनी गेल्या आॅगस्टमध्ये मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानात गळफास लावून आत्महत्या करण्यापूर्वी एक ६० पानी सविस्तर

60 children 'suicide bomb' before suicide | आत्महत्येपूर्वी ६० पानी ‘लेटरबॉम्ब’!

आत्महत्येपूर्वी ६० पानी ‘लेटरबॉम्ब’!

Next

नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कालिखो पुल यांनी गेल्या आॅगस्टमध्ये मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानात गळफास लावून आत्महत्या करण्यापूर्वी एक ६० पानी सविस्तर टिप्पण लिहून ठेवले होते व त्यात सर्वोच्च न्यायालायच्या आजी-माजी न्यायाधीशांसह अनेक काँग्रेस नेत्यांवर कोट्यवधी रुपयांची लांच घेतल्याचा आरोप केला होता, अशी माहिती आता बाहेर आली आहे.
गेल्या ९ आॅगस्ट रोजी पुल यांनी छताच्या पंख्याला फास घेऊन आत्महत्या केली तेव्हा अरुणालच प्रदेश पोलिसांना पूल यांनी ‘मेरे विचार’ या शीर्षकाने लिहिलेले हे हिंदी टिप्पण पोलिसांना मिळाले होते. या टिप्पणाच्या प्रत्येक पानावर पुल यांची स्वाक्षरी आहे व त्यांनी बहुधा महिनाभराचा वेळ घेऊन ते लिहिल्याचे तारखांवरून स्पष्ट होते.
दिवंगत पुल यांच्या पहिल्या पत्नी दांगविमसाई यांनी या टिप्पणाच्या अनुषंगाने शनिवारी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणी सीबीआय किंवा राष्ट्रीय तपासी यंत्रणा यासारख्या केंद्रीय संस्थेने तपास करण्याची मागणी केली. या टिप्पणात नामोल्लेख केलेल्या प्रत्येक न्यायाधीशाला व राजकीय नेत्याला ‘प्रकाशात’ आणून लांच घेतल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जावी, असे त्या म्हणाल्या.
पुल यांच्या आत्महत्येनंतर कुटुंबियांनी नोंदविलेल्या फिर्यादीचा राज्य सरकारने योग्यपणे तपास न केल्याने नवा एफआयआर नोंदवून तपास केला जावा, अशीही त्यांनी मागणी केली. सीबीआय तपासाची मागणी न करण्यासाठी विद्यमान राज्य सरकाकडून आपल्याला धमकावले, असाही त्यांनी आरोप केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)

धक्कादायक आरोप
माजी मुख्यमंत्री नाबाम तुकी यांना दोषी ठरवून सीबीआय तपासाच्या गुवाहाटी उच्च न्यायालायच्या निकालास स्थगिती देण्यासाठी माजी सरन्यायाधीश एच. एल. दत्तु यांना २८ कोटी रुपये देण्यात आले.माजी सरन्यायाधीश अल्तमास कबीर यांनी पैसे खाऊन अरुणाचलमधील रेशन घोटाळ््यात कंत्राटदारांच्या बाजूने निकाल दिला

 

Web Title: 60 children 'suicide bomb' before suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.