‘त्या’ कीटकनाशकावर ६० दिवसांची बंदी; एसआयटीची डावलली शिफारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:46 AM2018-03-22T00:46:13+5:302018-03-22T00:46:13+5:30

विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात गेल्या वर्षी कीटकनाशकांच्या फवारणीने विषबाधा होऊन काही शेतकऱ्यांचा बळी गेला होता. या प्रकरणाची चौकशी करणाºया विशेष तपास पथकाने (एसआयटी) मोनोक्रोटोफस या कीटकनाशकावर संपूर्ण राज्यात बंदी घालावी अशी शिफारस महाराष्ट्र सरकारला केली होती.

60 days ban on 'those' pesticides; Recommendations of SIT | ‘त्या’ कीटकनाशकावर ६० दिवसांची बंदी; एसआयटीची डावलली शिफारस

‘त्या’ कीटकनाशकावर ६० दिवसांची बंदी; एसआयटीची डावलली शिफारस

Next

- हरिश गुप्ता

नवी दिल्ली : विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात गेल्या वर्षी कीटकनाशकांच्या फवारणीने विषबाधा होऊन काही शेतकऱ्यांचा बळी गेला होता. या प्रकरणाची चौकशी करणाºया विशेष तपास पथकाने (एसआयटी) मोनोक्रोटोफस या कीटकनाशकावर संपूर्ण राज्यात बंदी घालावी अशी शिफारस महाराष्ट्र सरकारला केली होती. मात्र राज्य सरकारने फक्त ६० दिवसांचीच बंदी घातली अशी महत्वपूर्ण माहिती केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी लोकसभेत दिली.
तेलंगणा राष्ट्र समितीच्या ए. पी. जितेंद्र रेड्डी यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. कृषीमंत्र्यांनी पुढे सांगितले की, भारतात वापरण्याच्या दृष्टीने मोनोक्रोटोफस व आॅस्किडेमेन्टन-मिथाईल यांची किटकनाशके कायदा १९६८च्या अन्वये नोंदणी झाली आहे. भाज्यांवर मोनोक्रोटोफसची फवारणी करण्यास याआधीच बंदी घालण्यात आली आहे. मोनोक्रोटोफसामध्ये अन्य काही कीटकनाशके मिसळून त्याची फवारणी शेतकरी पिकांवर करण्यात येते. हे मिश्रण अशास्त्रीय आहे असा निष्कर्ष एसआयटीने आपल्या अहवालात काढला आहे.
५४६० नमुने आढळले दर्जाहीन
कृषीमंत्री राधामोहन सिंग म्हणाले की, कीटकनाशकांचा दर्जा तपासण्याची केंद्र व राज्य सरकारांकडे संयुक्त जबाबदारी आहे. अयोग्य कीटकनाशकांची विक्री रोखण्यासाठी केंद्र व राज्याने निरीक्षकही नियुक्त केले आहेत. कीटकनाशकांचे नमुने नेहमी गोळा केले जातात व त्यांची राज्यांतील ६९ कीटकनाशक प्रयोगशाळांमध्ये तपासणी जाते. अशीच तपासणी चंदिगढ व कानपूर येथे असलेल्या प्रादेशिक किटकनाशक प्रयोगशाळांमध्येही केली जाते. ज्या कीटकनाशकांमध्ये भेसळ आढळेल किंवा दर्जाहीन अशांच्या उत्पादकांवर कीटकनाशक कायद्यातील तरतूदीनूसार कारवाई केली जाते. २०१४-१५ या कालावधीत कीटकनाशकांचे १९५९२५ नमुने प्रयोगशाळांमध्ये तपासले गेले. त्यातील ५४६० नमुने हे दर्जाहीन आढळले.
मोनोक्रोटोफस सहित ६६ कीटकनाशकांची एका तज्ज्ञ समितीने २०१३ साली तपासणी केली होती. मोनोक्रोटोफसच्या वापरास काही देशात याआधीच बंदी घालण्यात आली आहे. मात्र या कीटकनाशकाचा वापर सुरु ठेवावा अशी शिफारस या समितीने केली होती. यवतमाळमध्ये कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकºयांचे जे बळी गेले ते प्रकार धक्कादायक होते असेही कृषीमंत्री राधामोहन सिंग म्हणाले.

Web Title: 60 days ban on 'those' pesticides; Recommendations of SIT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी