धक्कादायक! गॅस सिलेंडरच्या स्फोटात ६० घरे जळून खाक, ६ जण जखमी; तीन मुले बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 20:56 IST2025-03-29T20:49:12+5:302025-03-29T20:56:42+5:30
बिहारमधील बगाहा येथे गॅस सिलेंडर गळती आणि स्फोटामुळे ६० हून अधिक घरे जळून खाक झाल्याची माहिती समोर आली.

धक्कादायक! गॅस सिलेंडरच्या स्फोटात ६० घरे जळून खाक, ६ जण जखमी; तीन मुले बेपत्ता
बिहारमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शनिवारी संध्याकाळी बिहारमधील भिठा पोलीस स्टेशन परिसरातील देही पकडडी पंचायतीच्या बालुआडवा राजवंशी टोला येथे गॅस सिलेंडरच्या गळती आणि स्फोटामुळे लागलेल्या आगीत ६० हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या.
या आगीत डझनभर शेळ्या आणि इतर गुरे मृत्युमुखी पडली. आग विझवण्याचा प्रयत्न करत असताना ६ जणांचे हातपाय भाजले. तीन मुले बेपत्ता आहेत.
म्यानमारसाठी भारत बनला संकटमोचक! आग्र्याहून फील्ड हॉस्पिटल पाठवणार;ऑपरेशन ब्रह्मा सुरू
स्थानिकांनी दिलेली माहिती अशी, गावातील एका घरात जेवण बनवत होते. यावेळी अचानक गॅस सिलिंडरने पेट घेतला. काही वेळाने त्याचा स्फोट झाला. त्यामुळे गावात आग पसरली. आग पसरताच, इतर घरांमध्ये ठेवलेले गॅस सिलिंडर सतत स्फोट होऊ लागले.
या आगीत ६० हून अधिक घरे जळून खाक झाली. कपडे, धान्य आणि इतर वस्तू जळून खाक झाल्या.
आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेजारच्या उत्तर प्रदेशातून अग्निशमन दलासह पोलिसांचे पथकही दाखल झाल्याचे प्रमुखांनी सांगितले. सरपंचाचे पती रमाशंकर यादव म्हणाले की, या आगीच्या घटनेत ग्रामस्थांचे खूप नुकसान झाले आहे.
सर्व काही जळून राख झाले. घटनास्थळी पोहोचलेले पोलिस स्टेशन प्रभारी राकेश कुमार यांनी सांगितले की, आग आटोक्यात आणण्यात आली आहे. पोलिसांचे पथक ग्रामस्थांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचे काम करत आहे.