मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर ६० जणांना अंधत्व

By admin | Published: December 5, 2014 09:52 AM2014-12-05T09:52:02+5:302014-12-05T09:52:02+5:30

पंजाबमध्ये मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर ६० जणांना अंधत्व आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष बाब म्हणजे या मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरासाठी आयोजकांनी आरोग्य यंत्रणेची परवानगीच घेतली नव्हती.

60 people blindfolded after cataract surgery | मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर ६० जणांना अंधत्व

मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर ६० जणांना अंधत्व

Next

ऑनलाइन लोकमत 

अमृतसर, दि. ५ - छत्तीसगडमध्ये नसंबदीच्या शस्त्रक्रियेत ११ महिलांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना पंजाबमधील गुरुदासपूर येथे मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर ६० जणांना अंधत्व आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष बाब म्हणजे या मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरासाठी आयोजकांनी आरोग्य यंत्रणेची परवानगीच घेतली नसल्याचे उघड झाले आहे. 
गुरुदासपूर येथे एका सामाजिक संस्थेने दहा दिवसांपूर्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन केले होते. शस्त्रक्रियेनंतर या सर्वांना आय ड्रॉप देण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी या सर्वांना डोळ्यावरील पट्टी काढण्यास बोलवण्यात आले. डोळ्यावरील पट्टी काढल्यावर रुग्णांना काहीच दिसत नव्हते. आता या सर्वांना अमृतसरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आयोजकांनी मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेत कोणती औषधं वापरली, कोणते डॉक्टर शस्त्रक्रिया करतील याविषयीची कोणतीच माहिती सरकारी यंत्रणांना दिली नव्हती. ६० पैकी ६ ते ८ जणांना कायमचे अंधत्व आले असून उर्वरित रुग्णांची तपासणी सुरु असल्याचे सरकारी डॉक्टरांनी सांगितले. 
काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमध्ये नसबंदीच्या शस्त्रक्रियेनंतर ११ महिलांचा मृत्यू झाला होता. या दोन्ही घटनामुळे गोरगरिबांसाठी लागणा-या मेडिकल कॅम्पमधील उपचाराच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. 

Web Title: 60 people blindfolded after cataract surgery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.