पाणीपुरीतून ६० जणांना विषबाधा अकोला+वाशिम आवश्यक..........

By Admin | Published: February 20, 2016 12:34 AM2016-02-20T00:34:54+5:302016-02-20T00:34:54+5:30

पिंपळगाव सैलानी (बुलडाणा): येथून जवळच असलेल्या माळवंडी येथे पाणीपुरी खाल्याने लहान मुलांसह जवळपास ६० जणांना विषबाधा झाल्याची घटना गुरूवारी रात्री १०़३० वाजता घडली़ काहींवर बुलडाण्यातील खासगी, तर काहींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून, सध्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे़

60 people get poisoning from Jalpur to Akola + Washim .......... | पाणीपुरीतून ६० जणांना विषबाधा अकोला+वाशिम आवश्यक..........

पाणीपुरीतून ६० जणांना विषबाधा अकोला+वाशिम आवश्यक..........

googlenewsNext
ंपळगाव सैलानी (बुलडाणा): येथून जवळच असलेल्या माळवंडी येथे पाणीपुरी खाल्याने लहान मुलांसह जवळपास ६० जणांना विषबाधा झाल्याची घटना गुरूवारी रात्री १०़३० वाजता घडली़ काहींवर बुलडाण्यातील खासगी, तर काहींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून, सध्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे़
गुरूवारी रात्री ९ ते १० वाजताच्या सुमारास माळवंडी येथील काही बालकांनी गावातीलच एका पाणीपुरी विक्रेत्याकडे पाणीपुरी खाल्ली़ काही वेळातच या बालकांना मळमळ होऊन उलट्या व शौचाचा त्रास सुरू झाला़ सुरूवातीला घरच्या मंडळीनी दुर्लक्ष केले; मात्र त्रास वाढू लागल्याने आणि रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने गावकर्‍यांमध्ये घबराट पसरली. पाहता- पाहता रूग्णांचा आकडा ४०- ५० वर पोहोचला़ काही रूग्णांवर खासगी रूग्णालयात उपचार करण्यात आले, तर जवळपास ३० ते ४० जणांना रात्री उशीरा जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले़ रात्रभर उपचार केल्यानंतर २० ते २५ जणांना डॉक्टरांनी शुक्रवारी सुटी दिली़ काही रुग्णावर जिल्हा सामान्य रुग्णालयात अद्यापही उपचार सुरू आहेत़

Web Title: 60 people get poisoning from Jalpur to Akola + Washim ..........

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.