काश्मीरमध्ये 60 दहशतवाद्यांची घुसखोरी

By admin | Published: August 18, 2016 08:19 AM2016-08-18T08:19:40+5:302016-08-18T08:19:40+5:30

काश्मीरमध्ये गेले काही दिवस सुरु असलेल्या हिंसाचाराचा तसंच परिस्थितीचा फायदा घेत 60 दहशतवाद्यांनी घुसखोरी केली असल्याची माहिती आहे

60 terrorists infiltrated in Kashmir | काश्मीरमध्ये 60 दहशतवाद्यांची घुसखोरी

काश्मीरमध्ये 60 दहशतवाद्यांची घुसखोरी

Next
>- ऑनलाइन लोकमत 
श्रीनगर, दि. 18 - काश्मीरमध्ये गेले काही दिवस सुरु असलेल्या हिंसाचाराचा तसंच परिस्थितीचा फायदा घेत 60 दहशतवाद्यांनी घुसखोरी केली असल्याची माहिती आहे. उत्तर काश्मीरमधील कुपवारा आणि उरी सेक्टरमधून ही घुसखोरी करण्यात आली आहे. मध्य आणि दक्षिण काश्मीरमध्ये हे दहशतवादी घुसखोरी करुन लपून बसले असल्याची शक्यता आहे. 
 
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार 'दहशतवादी काश्मीर खो-यात उपस्थित असून एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी प्रवास करत आहेत. हिजबूल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बु-हान वानीचा 8 जुलै रोजी खात्मा केल्यानंतर काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचाराला सुरुवात झाली होती, याचा फायदा घेत दहशतवादी घुसले असल्याचं', गुप्तचर खात्यामधील अधिका-याने सांगितलं आहे. 
 
बुधवारी हिजबूल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांनी सकाळी 3 वाजता जवानांच्या ताफ्यावर हल्ला केला होता. बारामुल्ला येथे झालेल्या या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले होते. हिजबूलने हल्ल्याची जबाबदारी घेत कमांडर सैफुल्लाह खालीदने हल्ला करण्याचे आदेश दिल्याचं त्यांच्या प्रवक्त्याने सांगितलं होतं.
 
'गेल्या काही आठवड्यात 60 दहशतवाद्यांनी पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधून भारतात घुसखोरी केली आहे. लष्कर या दहशतवाद्यांनी पुन्हा मागे फिरवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात फायरिंग केली जात आहे.  यामध्ये काही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यातही यश मिळालं आहे. आतापर्यंत पाच दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात आल्याचं', गुप्तचर अधिका-याने सांगितलं आहे. 
 
हिजबूल मुजाहिद्दीनचे दहशतवादी त्राल परिसरातील तरुणांना प्रशिक्षण देत असून त्यांना भरती करुन घेत आहे. परिस्थितीचं गांभीर्य पाहता श्रीनगरमध्ये संपुर्ण परिसरात कर्फ्यू लावण्यात आला आहे अशी माहिती गुप्तचर अधिका-याने दिली आहे.
 

Web Title: 60 terrorists infiltrated in Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.