६0 वर्षांत देशाचा विकास नाहीच
By Admin | Published: August 14, 2016 02:01 AM2016-08-14T02:01:07+5:302016-08-14T02:01:07+5:30
स्वातंत्र्यानंतर या देशावर एकाच घराण्याची सत्ता राहिल्यामुळे कोणताही विकास होऊ शकला नाही, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शाह यांनी केला.
काकोरी (उत्तर प्रदेश) : स्वातंत्र्यानंतर या देशावर एकाच घराण्याची सत्ता राहिल्यामुळे कोणताही विकास होऊ शकला नाही, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शाह यांनी केला. केवळ भाजपाच विकास करू शकते, असेही ते म्हणाले. शाह यांनी गांधी-नेहरू घराण्याला विकास न झाल्याबद्दल जबाबदार धरले.
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भाजपाने ‘तिरंगा यात्रा’ आयोजित केली आहे. त्यानिमित्त ‘याद करो कुर्बानी’ कार्यक्रमात ते बोलत
होते. उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून शाह म्हणाले की, ‘भारताला स्वातंत्र्य मिळून ७0 वर्षे झाली आहेत. यापैकी ६0 वर्षे या देशावर एकाच कुटुंबाची सत्ता राहिली.’
विकास करण्याची क्षमता केवळ भाजपातच आहे. उत्तर प्रदेशात आता भाजपाची सत्ता आली, तरच या राज्याचा विकास होऊ शकेल. समाजवादी पार्टी अथवा बहुजन समाज पार्टी यांची सत्ता आल्यास केवळ एकाच विशिष्ट समाजाचा विकास होईल. ‘सबका साथ, सबका विकास’ या तत्त्वावर भाजपाचा विश्वास आहे, असे सांगून शाह म्हणाले की, ‘उत्तर प्रदेशचा विकास झाला, तरच देशाचा विकास होईल.’ (वृत्तसंस्था)