शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी "या" आजोबांनी चालवली तब्बल 11 दिवस 1000 किमी सायकल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 02:27 PM2020-12-18T14:27:52+5:302020-12-18T14:30:12+5:30

Satyadev Manjhi And Farmers Protest : गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.

60 years old satyadev manjhi wanted to support farmers riding 1000 km cycling to reach border | शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी "या" आजोबांनी चालवली तब्बल 11 दिवस 1000 किमी सायकल

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी "या" आजोबांनी चालवली तब्बल 11 दिवस 1000 किमी सायकल

Next

नवी दिल्ली - केंद्र सरकारने कृषी कायदा मागे घ्यावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत. कायदे रद्दच करा, ही मागणी पूर्ण झाल्याशिवाय येथून हलणार नाही, असा इशारा देत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एका व्यक्तीने तब्बल 1000 किमीचा प्रवास केला आहे. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी तब्बल 11 दिवस सायकल चालवली आहे. 

सत्यदेव मांझी असं या व्यक्तीचं नाव असून ते शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्ली-हरियाणाच्या टिकरी सीमेवर पोहोचले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 60 वर्षीय सत्यदेव हे बिहारच्या सीवान जिल्ह्याचे रहिवासी आहेत. दिल्ली-हरियाणाच्या टिकरी सीमेवर शेतकऱ्यांना आपले समर्थन देण्यासाठी पोहोचले आहेत. शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांनी सलग 11 दिवस सायकल चालवत 1000 किलोमीटरचे अंतर पार करत प्रवास केला. शेतकऱ्यांचे हीत पाहता सरकारने तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत अशी विनंती सत्यदेव मांझी यांनी केंद्र सरकारला केली आहे. 

सत्यदेव मांझी यांनी एएनआयशी बोलताना, "मला सीवान येथून टिकरी सीमेवर पोहोचण्यासाठी 11 दिवस लागले. मी सरकारला तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची विनंती केली आहे. शेतकऱ्यांचे हे आंदोलन संपेपर्यंत मी आता इथेच राहणार आहे" असं म्हटलं आहे. कडाक्याच्या थंडीत गेल्या 22 दिवसांपासून केंद्राच्या कृषी कायद्यांचा विरोध करत शेतकरी आंदोलन करत आहेत. याच दरम्यान गुरुवारी पहाटे शेतकरी आंदोलनातील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. 

कडाक्याच्या थंडीत शेतकरी आंदोलनातील आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू

दिल्ली-हरियाणाच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनामध्ये पंजाबच्या एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. कडाक्याच्या थंडीमुळे मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे. पंजाबच्या या 37 वर्षीय शेतकऱ्याला 10, 12 आणि 14 वर्षांची तीन मुलं आहेत. शेतकऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार, नोव्हेंबरमध्ये सुरू झालेल्या या आंदोलनादरम्यान आत्तापर्यंत जवळपास 20 आंदोलक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांत दिल्ली आणि आजूबाजूच्या भागात तापमान कमी आहे. पहाटेच्या सुमारास जवळपास पाच डिग्रीपर्यंत तापमानाची नोंद करण्यात आली आहे. दिवसाही तापमान 4 डिग्रीपर्यंत नोंदवण्यात येतं. कडाक्याच्या थंडीतही आपला जीव धोक्यात घालूनही शेतकरी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. 

कडक सॅल्यूट! सिंघू बॉर्डरवर कडाक्याच्या थंडीत बसलेल्या शेतकऱ्यांना 'ही' व्यक्ती वाटते मोफत स्वेटर

सिंघू बॉर्डरवर शकील मोहम्मद कुरेशी कडाक्याच्या थंडीत बसलेल्या शेतकऱ्यांच्या प्रति असलेला आदर व्यक्त करत आहेत. शकील मोहम्मद कुरेशी शेतकऱ्यांना मोफत स्वेटर वाटत आहेत. दररोज सकाळी आठ वाजता कुरेशी रस्त्याच्या कडेला आपला स्टॉल लावतात आणि स्थानिक ठिकाणी तयार केलेले स्वेटर नव्या केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्ली-हरयाणा सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना ते मोफत वाटत आहेत. कुरेशी यांनी शेतकऱ्यांना आतापर्यंत 300 जॅकेट्स आणि स्वेटरचं वाटप केलं आहे. कुरेशी हे गरम कपडे विकण्याचे काम करतात. ते दररोज 2500 रुपयांची कमाई करतात. 

Web Title: 60 years old satyadev manjhi wanted to support farmers riding 1000 km cycling to reach border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.