विद्यार्थ्यांअभावी देशभरातील ६०० इंजिनीअरिंग कॉलेज केली बंद - प्रकाश जावडेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 09:50 AM2018-08-29T09:50:16+5:302018-08-29T09:51:02+5:30

कुठे विद्याशाखांचा अभाव, तर कुठे विद्यार्थीच नसल्याने सरकारने देशातील सरकारी व खाजगी अशी ६०० अभियांत्रिकी महाविद्यालये बंद केली आहेत.

600 engineering colleges shut down due to lack of students - Prakash Javadekar | विद्यार्थ्यांअभावी देशभरातील ६०० इंजिनीअरिंग कॉलेज केली बंद - प्रकाश जावडेकर

विद्यार्थ्यांअभावी देशभरातील ६०० इंजिनीअरिंग कॉलेज केली बंद - प्रकाश जावडेकर

Next

- हरीश गुप्ता
नवी दिल्ली - कुठे विद्याशाखांचा अभाव, तर कुठे विद्यार्थीच नसल्याने सरकारने देशातील सरकारी व खाजगी अशी ६०० अभियांत्रिकी महाविद्यालये बंद केली आहेत.
मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, शैक्षणिक सुविधांचा अभाव, विद्यार्थ्याची वानवा असलेली ६०० अभियांत्रिकी महाविद्यालये काही वर्षांत बंद करण्याचे आदेश देण्यात आले. यात अभियांत्रिकी महाविद्यालये तसेच बी. टेक व अन्य पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या संस्था तसेच तांत्रिक महाविद्यालयांचा समावेश आहे.
कमी विद्यार्थी व अन्य कारणांनी आणखी १५० महाविद्यालयांना प्रवेशास बंदी घातली जाईल.. मात्र असलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण करता येईल. याला जावडेकर यांनी दुजोरा दिला नाही.
अभियांत्रिकी शिक्षणाचा दर्जा सुधारणे व पर्यायी अभ्यासक्रम सुरू करणे यासाठी सरकार प्रयत्न करीत असून, त्यात काही अभियांत्रिकी महाविद्यालये बंद होतील. काहींचे रूपांतर मॉल्स, व्यवसाय केंद्रात होईल वा तिथे नवे अभ्यासक्रम सुरू होत आहेत. या महाविद्यालयांत २०११-१२ पासून ओहोटी सुरू झाली आणि २०१४ पर्यंत स्थिती दयनीय झाली. दरवर्षी ७५ हजारांची घट
अखिल भारतीय तंत्र परिषदेच्या माहितीनुसार वर्षाकाठी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या संख्येत ७५ हजारांनी घट झाली आहे.
 

Web Title: 600 engineering colleges shut down due to lack of students - Prakash Javadekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.