तान्हुली पावलं येती घरा...भारतात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ६० हजार बालकांचा जन्म; जागतिक विक्रमाची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 08:43 PM2022-01-03T20:43:38+5:302022-01-03T20:43:59+5:30
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच १ जानेवारी २०२२ रोजी भारतानं जागतिक विक्रमाची नोंद केली आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी देशात ६० हजाराहून अधिक बालकांनी जन्म घेतला आहे.
नवी दिल्ली-
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच १ जानेवारी २०२२ रोजी भारतानं जागतिक विक्रमाची नोंद केली आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी देशात ६० हजाराहून अधिक बालकांनी जन्म घेतला आहे. विशेष म्हणजे हा जागतिक विक्रम ठरला आहे. इतर कोणत्याही देशात इतक्या मोठ्या संख्येनं १ जानेवारी रोजी बालकांचा जन्म झालेला नाही. दरम्यान, यावर्षीचा आकडा २०२० पेक्षा ७ हजार ३९० नं कमीच आहे.
युनिसेफनं व्यक्त केलेल्या अंदाजानुसार भारतापाठोपाठ चीनमध्ये यावर्षी १ जानेवारी रोजी ३५ हजार ६१५ बालकांच्या जन्माची नोंद झाली आहे. तर संपूर्ण जगात नववर्षाच्या पहिल्या दिवशी एकूण ३ लाख ७१ हजार ५०४ हून अधिक चिमुकल्यांनी या भूतलावर जन्म घेतला आहे. यातील ५२ टक्के चिमुकली मुलं तर केवळ १० देशांमध्ये जन्मली आहेत.
"जगभरात नववर्षाच्या पहिल्या दिवशी जन्मलेल्या बालकांमध्ये भारत (५९,९९५), चीन (३५,६१५), नायजेरिया (२१,४३९), पाकिस्तान (१४,१६१), इंडोनेशिया (१२,३३६), इथिओपिया (१२,००६), यूएस (१०,३१२), इजिप्त (९,४५५), बांगलादेश (९२३६) आणि डेमॉक्रेटिक रिपलब्लिक ऑफ काँगो (८,६४०) हे १० देश आघाडीवर आहेत", असं यूनिसेफनं आपल्या अहवालात नमूद केलं आहे.
अहवालानुसार २०२१ या वर्षात भारतात जन्मलेल्या बालकांचं आर्युमान ८०.९ वर्ष इतकं असणार आहे. भारत सरकारनं नवाज बालकांसाठी उभारलेल्या विशेष केअर युनिट्सच्या पुढाकारामुळे देशात नवजात बालकांच्या मृत्यूचं प्रमाण देखील कमी झालं आहे. यामुळे दरदिवसामागे १ हजार बालकांची भारताची क्षमता वाढली आहे. २०१४ ते २०२० या काळात जवळपास ३२० जिल्ह्या पातळीवरील विशेष केअर युनिट्सची उभारणी सरकारनं केली आहे.