दिल्लीत १० दिवसात ६० हजार कोरोना रुग्ण; केजरीवाल घेणार मोठा निर्णय?

By मोरेश्वर येरम | Published: November 19, 2020 11:08 AM2020-11-19T11:08:27+5:302020-11-19T11:59:20+5:30

दिल्लीतील भनायक परिस्थिती पाहता केजरीवाल मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याआधीच दिल्लीमध्ये मिनी लॉकडाउनची चर्चा आहे. पण त्यापेक्षाही कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत आप सरकार असल्याचं बोललं जात आहे. 

60000 new covid cases in 10 days in Delhi Kejriwal to take big decision | दिल्लीत १० दिवसात ६० हजार कोरोना रुग्ण; केजरीवाल घेणार मोठा निर्णय?

दिल्लीत १० दिवसात ६० हजार कोरोना रुग्ण; केजरीवाल घेणार मोठा निर्णय?

Next
ठळक मुद्देगेल्या २४ तासांत दिल्लीत १३१ जणांचा मृत्यू, आतापर्यंतचा सर्वाधिक आकडादिल्लीत आतापर्यंत साडेचार लाख रुग्णांनी केली कोरोनावर मातदिल्लीमध्ये मिनी लॉकडाउनची चर्चा

नवी दिल्ली
देशाच्या राजधानीत करोनाने भनायक रुप धारण केलं आहे. गेल्या १० दिवसात दिल्लीत एकूण ६० हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दिल्लीतील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज तातडीची बैठक बोलावली आहे. 

दिल्लीतील भनायक परिस्थिती पाहता केजरीवाल मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याआधीच दिल्लीमध्ये मिनी लॉकडाउनची चर्चा आहे. पण त्यापेक्षाही कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत आप सरकार असल्याचं बोललं जात आहे. 

दिल्लीत गेल्या २४ तासांत करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या आकडेवारीने नवा रेकॉर्ड केला आहे. एका दिवसात तब्बल १३१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर गेल्या २४ तासांत ७,४८६ नव्या रुग्णांची भर पडली आहे. दिल्लीत आतापर्यंतच्या रुग्णसंख्येने ५ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. 

मुख्यमंत्री केजरीवाल यांनी स्वत: जीटीबी रुग्णालयला भेट देऊन आरोग्य सेवांची पाहणी केली. जीटीबी रुग्णालयात २३२ आयसीयू बेड्स वाढविण्यास मंजुरी देण्यात आल्याचं केजरीवाल यांनी यावेळी सांगितलं. याशिवाय दिल्लीतील धर्मशाळांमध्ये ६६३ आयसीयू बेड्स वाढविण्यात येणार आहेत. बाजार पेठा बंद करण्याबद्दल बोलत असताना केजरीवाल यांनी गरज भासल्यास काही बाजारपेठा बंद ठेवाव्या लागतील असं स्पष्ट केलं आहे. 

दिल्लीत नवनवे रेकॉर्ड
>> गेल्या २४ तासांत १३१ जणांचा मृत्यू, आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा
>> याआधी १२ नोव्हेंबर रोजी एका दिवसात १०४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती
>> ९ नोव्हेंबरपासून १८ नोव्हेंबरपर्यंत एकूण ५९,५३२ नव्या रुग्णांची नोंद
>> दिल्लीत आतापर्यंत साडेचार लाख रुग्णांनी केली करोनावर मात

दिल्लीतील कोरोना संदर्भातील आतापर्यंतची आकडेवारी
>> एकूण ७,९४३ जणांचा मृत्यू
>> सध्या अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या- ४२,४५८
>> एकूण कोरोना रुग्णांची संख्या- ५ लाख ३ हजार ८४
>> गेल्या २४ तासांत बरे झालेले रुग्ण- ६,९०१
>> दिल्लीतील कन्टेंमेंट झोन- ४४४४
>> गेल्या २४ तासांत झालेल्या एकूण चाचण्या- ६२,२३२ (आरटीपीसीआर- १९०८५, अँटीजेन- ४३,१४७)
>>आतापर्यंत झालेल्या एकूण चाचण्या- ५५,९०,६५४

Web Title: 60000 new covid cases in 10 days in Delhi Kejriwal to take big decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.