६०० कि.मी.च्या पायी प्रवासात कुत्रीने दिली साथ
By admin | Published: January 5, 2017 02:44 AM2017-01-05T02:44:03+5:302017-01-05T02:44:03+5:30
जनावरांना माणसांचा आणि माणसांचा जनावरांनाही लळा लागणे काय असते हे आपण ऐकलेले असते. याचाच अनुभव शबरीमालाच्या यात्रेला निघालेल्या नवीन या यात्रेकरुला आला.
शबरीमाला : जनावरांना माणसांचा आणि माणसांचा जनावरांनाही लळा लागणे काय असते हे आपण ऐकलेले असते. याचाच अनुभव शबरीमालाच्या यात्रेला निघालेल्या नवीन या यात्रेकरुला आला. मालू नावाच्या कुत्रीने नवीन यांची थोडीथोडकी नव्हे तर ६०० किलोमीटर सोबत केली. ८ डिसेंबर रोजी नवीन यांच्याशी मालूची भेट झाली व तिने मग त्यांची सोबत कधीच सोडली नाही.
नवीन हे उडुपीतील कोल्लूर येथील मुकमबिका मंदिरापासून पायी ७०० किलोमीटरच्या शबरीमाला यात्रेसाठी निघाले. त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांची
मालूशी भेट झाली. नवीन यांनी १७ दिवसांत हे ६०० किलोमीटरचे अंतर पायी पूर्ण केले. या संपूर्ण प्रवासात मालू त्यांच्यासोबत होती. २३ डिसेंबर रोजी नवीन घरी ारतले तेव्हाही मालू त्यांच्यासोबत होती. ते म्हणाले, जवळपास
८० किलोमीटरचा प्रवास झाल्यानंतर मालूकडे माझे लक्ष गेले. मालू माझ्याकडे विरुद्ध दिशेने चालत आली आणि माझ्या उजव्या समोर उजव्या बाजुला येऊन थांबली. मी तिला हुसकावून लावण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला परंतु ती गेली नाही. मालुने नेहमीच नवीन यांच्यापासून साधारणत: २० मीटरचे अंतर राखले.